Download App

Supreme Court : ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाने फटकारले.. पक्षचिन्हाच्या याचिकेवर तातडीने सुनावणीस नकार

Shivsena Symbol issue : राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाला झटक्यांमागून झटके बसत आहेत. पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली. मात्र येथेही सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला चांगलेच फटकारत आज याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला आहे.

हे वाचा : Thackeray Vs Shinde : आदित्य ठाकरे यांची आमदारकी एकनाथ शिंदे घालविणार? कायदा म्हणतो

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आज ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोर्टाने त्यांना मेन्शनिंग लिस्ट अंतर्गत येण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत अर्ज मेन्शन न करताच सुनावणीची विनंती केली होती. त्यावर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) म्हणाले, “मेन्शनिंग लिस्ट मध्ये अर्ज दाखल करायला पाहीजे. लिस्टेड नसताना कोणतीही तारीख कोर्ट देऊ शकत नाही. आधी तुम्ही याचिका दाखल करण्याची औपचारिकता पूर्ण करा आणि मग उद्या कोर्टात या तेव्हा पाहू.”

दरम्यान, आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला चांगलाच झटका बसला आहे. आता पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले आहे. त्यानंतर शिंदे गटाने आक्रमक होत पक्षाच्या विधीमंडळातील कार्यालयाचा ताबा घेण्यात आला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह काही आमदार विधीमंडळात दाखल झाले आणि शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. त्यामुळ दोन्ही गटांतील वाद आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. सध्या या मुद्द्यावर राजकारण चांगलेच तापले आहे.

Tags

follow us