Download App

ठाकरे पुन्हा कोर्टात! धनुष्यबाण कुणाचा?, ठाकरे की शिंदे? 16 जुलैला होणार ‘सुप्रीम’ सुनावणी

येत्या 16 जुलैला धनुष्यबाण कोणाचा यावर सुनावणी होणार आहे, ठाकरेंच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत

Shiv Sena clash : महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी बातमी काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या चिन्हासाठी ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Sena) ठाकरे गटाकडून आज पुन्हा एकदा हे प्रकरण सुप्रीम कोर्टात मेन्शन करण्यात आलं आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकरण प्रलंबित आहे. प्रकरण लवकर बोर्डावर घ्या अशी मागणी आता ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. या प्रकरणावर आता येत्या 16 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

येत्या 16 जुलैला धनुष्यबाण कोणाचा यावर सुनावणी होणार आहे, ठाकरेंच्या वकिलांनी स्थानिक निवडणुकांचा हवाला देत चिन्हावर सुनावणीची मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे, असा युक्तिवाद ठाकरेंच्या वकिलांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे तातडीच्या सुनावणीला शिवसेना शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्याचा मुद्दा शिवसेना शिंदे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावर न्यायाधिशांनी येत्या 16 जुलैला सुनावणी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 17 फ्रेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. यावर आता 16 जुलैला सुनावणी होणार आहे.

आता काही लोक म्हणतील मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार.. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर थेट वार

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केला, या उठावानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षाचे दोन गट पडले. शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट. शिवसेनेतील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

दरम्यान त्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर देखील दावा करण्यात आला होता. 17 फ्रेब्रुवारी 2023 ला निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदे गटाचा चिन्हावरील दावा मान्य केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

follow us

संबंधित बातम्या