Download App

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार? स्वत: उद्धव ठाकरे यांचा मोठा खुलासा, नेमक काय म्हणाले?

आज महाविकास पदाधिकारी मेळावा होत असून त्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री चेहरा कोण यावर भाष्य केलं.

  • Written By: Last Updated:

Mahavikas Aghadi Padadhikari Melava : गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार अशी ही चर्चा आहे. परंतु, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. यांना माझं सांगण आहे की आपण करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर माझा त्याला पाठिंबा असेल असं उद्ध ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत. मला मुख्यमंत्री पदाबाबत स्वप्न पडत नाहीत. तशी इच्छा बाळगूनही मी काम करत नाही. त्यामुळे आपण जो कोणी चेहरा जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा असणार  आहे असा पुनरउच्चार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला  आहे. ते महाविकास आघाडी पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांचं स्वातंत्र्यावर मोठं विधान; चोखामेळ्याचा उल्लेख करत बांगलादेशाचा दिला दाखला

अगोदर ठरवा

आम्ही शिवसेना म्हणून भाजपसोबत होतो. त्यामध्ये जो आम्हाला अनुभव आला तो महाविकास आघीडमध्ये यायला नकोय. कारण ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री असं धोरण ठरलं. त्यामुळे युतीमध्येच याची ही जागा पाडा ती जागा पाडा यामध्ये आम्ही स्वत:च्याच पायावर धोंडा टाकून घेताल आहे. त्यामुळे हे धोरण महाविकास आघाडीत नको. आगेदर ठरवा आणि चला पुढे मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणत थेट मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करावा अशी मागणीच यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

अजित पवारांना बारामतीकरांनी पिळून काढलय; नोव्हेंबरमध्ये आमचं सरकार येणार, राऊतांचा विश्वास

जनतेची लूट

50 हजार योजना दूत हे नेमणार आहेत. त्यातही योजना पोहचवणाऱ्यांना 10 हजार रुपये महिना आणि महिलांना दीड हजार महिना दिला जातोय. म्हणजे पाहा जनतेला कसं लुटलं जातय असा थेट घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसंच, हेज जर अशा पद्धतीने जनतेचा पैसा उधळणार असतील तर आपण महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळातील काम का लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीत असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना केली आहे.

follow us