Download App

Budget Session : चोर मंडळात उद्धव ठाकरेही.., देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांवर पलटवार

मुंबई : आम्ही चोर आणि गुंडामंडळ आहोत काय?, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर केला आहे. तसेच कुणी गाय मारली तर वासरु मारावं हे योग्य नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस संजय राऊतांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत यांनी विधीमंडळातील लोकांना चोर संबोधले आहे. असं असेल तर उद्धव ठाकरे देखील याच विधानमंडळाचे सदस्य आहेत. चोर म्हटल्यानंतर त्यामध्ये सगळेच येत असल्याचा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.

आता संजय राऊतांनी चोर म्हटल्यानंतर कोणी हे गुंडामंडळ आहे असं म्हणेल, मग आम्ही सगळे काय चोर गुंडामंडळ आहोत काय? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राऊतांचा सामूहिक निषेध या सभागृहात करुन त्यांच्यावर हक्कभंग करण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीसांना लावून धरली आहे.

IND vs AUS 3rd Test : नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, घेतला फलंदाजीचा निर्णय

आज विधीमंडळाला संजय राऊत चोर म्हणताहेत, जर आज त्यांच्यावर कारवाई झाली नाहीतर उद्या हजारो संजय राऊत तयार होणार असल्याचं भाकीत फडणवीस यांनी केलंय. सभागृहात राऊतांचा निषेध व्यक्त करीत असताना देवेंद्र फडणवीस आक्रमक झाल्याचं दिसून आले आहेत.


IND vs AUS, 3rd Test : पहिली फलंदाजी घेणं टीम इंडिया पडलं महागात !

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त करीत संजय राऊतांनी केलेला अपमान आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशाराही महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. तसेच संजय राऊतांना आजच अटक झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी यावेळी केलीय.

काय म्हणाले होते संजय राऊत?
आम्हाला बाळासाहेबांनी पदे दिली आहेत, यामुळे त्यांनी पदावरून काढलं, तरी आम्ही अशी पदे त्यांच्यावर ओवाळून टाकतो. डुप्लिकेट शिवसेनेचं हे विधीमंडळ असून हे विधीमंडळ चोरमंडळ आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर संजय राऊत यांच्या वक्तव्यावरुन सभागृहात गोंधळ उडाला आहे. सभागृहात गोंधळ उडाल्यानंतर आजच्या दिवसापर्यंत सभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. तर संजय राऊतांच्या हक्कभंगाच्या कारवाईवर 8 मार्चला निर्णय होणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.

Tags

follow us