IND vs AUS 3rd Test : नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, घेतला फलंदाजीचा निर्णय

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out (3)

IND vs AUS 3rd Test : भारत (IND) आणि ऑस्ट्रेलिया (AUS) यांच्यात चार कसोटी सामन्यांच्या मालिकेमधील तिसरा सामना आजपासून इंदूरमध्ये खेळवला जात आहे. (IND vs AUS) टीम इंडियाने पहिले २ कसोटी सामने जिंकून मालिकेत २-० असा अजेंडा घेतला आहे. (IND vs AUS 3rd Test) पण हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. (3rd Test Toss Update ) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियामध्ये २ बदल करण्यात आले आहेत. केएल राहुलच्या जागी गिलला स्थान मिळाले आहे. तर शमीला विश्रांती देण्यात आली. त्याच्या जागी उमेश यादवला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवला आहे.

ऑस्ट्रेलियन संघात हे २ बदल करण्यात आले आहेत. डेव्हिड वॉर्नर आणि पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघात परतल्याने या कसोटीचा भाग नाही. वॉर्नरची जागा कॅमेरून ग्रीनने घेतली आहे. तर स्टार्कने कमिन्सची जागा घेतली. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाकडे वेगवान गोलंदाजीचा अतिरिक्त पर्याय आहे.

IND vs AUS 3rd Test : आजपासून इंदूरमध्ये रंगणार भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरी टेस्ट मॅच

इंदूर कसोटीसाठी दोन्ही संघ

भारताची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ (क), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमेरॉन ग्रीन, अलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नॅथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन

Tags

follow us