Download App

उद्धव ठाकरेंनी खरंच राजीनामा दिला का? राज्यपाल भवनातून धक्कादायक माहिती समोर

Uddhav Thackeray :  राज्यामध्ये सत्तासंघर्ष सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सध्या हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे आहे. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये हा निकाल लागू शकतो, असे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन संजय यादव या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी राज्यपाल भवनाकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर आता यादव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

WhatsApp Image 2023 05 10 At 2.12.05 PM

राज्यात सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी फक्त तोंडी मुख्यमंत्री पदाचा व आमदारकीचा राजीनामा दिल्याचे ऐकिवात होते. हा राजीनामा राजभवन कार्यालयात राज्यपाल महोदयांकडे उपलब्ध आहे का,असल्यास त्याची साक्षांकित प्रत मिळावी याची मागणी मी माहिती अधिकारात केली होती, असे यादव म्हणाले आहेत.

Sanjay Raut : ‘मी कुठे म्हणतो सामनाला…’ राऊत-पवारांमधील टीकेचा सिलसिला सुरूच

यावर राज्यपालांचे सचिवालय राजभवन कार्यालयाने सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे व राज्यपाल हे ही यात पक्षकार असल्याने याबाबत कोणतीही माहिती देता येणार नसल्याचा अजब दावा केला आहे. यामुळे नेमका माजी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांचा राजीनामा न्यायप्रविष्ठ कारण पुढे करत राजभवन कार्यालयास जाणुनबूजुन उपलब्ध करायचा नाही की वास्तविक त्यांचेकडे असा कोणता राजीनामाच उपलब्धच नाही हा मोठा प्रश्न या निमित्ताने पडतो आहे.

 

अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं; SC च्या निर्णयाआधी नार्वेकरांचं पुन्हा महत्त्वाचं विधान

यापुर्वी जेव्हा मराठा आरक्षण व धनगर आरक्षणाबाबत मी माहिती अधिकारात माहिती मागविली होती त्यावेळेस राज्य सरकाराने न्यायप्रविष्ठ बाब असताना देखील दोन्ही प्रकरणात मला माहिती उपलब्ध केली होती त्यामुळे नेमके या प्रकरणात माहिती न्यायप्रविष्ठ असल्याचे कारण पुढे करुन नेमकी कोणाच्या दबावामुळे नाकारली जात आहे हा चौकशीचा भाग आहे, असे मत यादव यांनी व्यक्त केले आहे.

Tags

follow us