Uddhav Thackeray Sits In Last Row At India Alliance Meeting : दिल्लीत इंडिया आघाडीची (India Alliance Meeting) काल (7 ऑगस्ट) रोजी बैठक पार पडली. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीतील सुनहरी बाग रस्त्यावर असलेल्या शासकीय निवासस्थानी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी निवडणूक आयोगावरील आपले आरोप पुन्हा एकदा मांडले. मात्र, या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मागच्या रांगेत बसल्याचे फोटो समोर आले. त्यानंतर सत्ताधारी पक्षाकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी बैठक व्यवस्थेवरून ठाकरेंना लक्ष्य केलंय.
आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…
#शिवरायांचा वारसा सांगता ना रे…
खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन
शेवटच्या रांगेत बसलात रे????#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला
अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला
तुम्ही यातलं… pic.twitter.com/9pr7sDwwqX— Naresh Mhaske (@nareshmhaske) August 8, 2025
या स्नेहभोजनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, द्रमुक नेत्या कनिमोळी, उद्धव ठाकरे अन् त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव (BJP) अन् रामगोपाल यादव, तृणमूल काँग्रेस नेते अभिषेक बॅनर्जी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला, पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती, तसेच डाव्या आघाडीचे नेते डी. राजा हे उपस्थित होते. यावेळी ठाकरे (Shiv Sena) सातव्या रांगेत बसलेले दिसल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
भाजपची टीका
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपसोबत होते, तेव्हा त्यांना आणि ‘मातोश्री’ला विशेष मान मिळायचा. 2019 लोकसभा निवडणुकीत अमित शाह स्वतः मातोश्रीवर आले होते. पण हिंदुत्व आणि विचारधारा सोडल्याने सन्मानही गेला आणि आता तर बैठकीत थेट शेवटच्या रांगेत बसण्याची वेळ आली आहे.
टीम इंडियासाठी बॅडन्यूज! दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू आशिया कपमधून बाहेर?, कधी होणार वापसी
ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीत सामील झाल्यापासून राहुल गांधी किंवा सोनिया गांधी मातोश्रीवर गेलेत का? बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला काँग्रेसच्या नेत्यांनी अभिवादन केले का? बाळासाहेबांना ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणून गौरवले का? याची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत. उलट, आता दरवर्षी उद्धव ठाकरेच दिल्लीला जाऊन राहुल आणि सोनिया गांधींना भेटतात.
आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…
#शिवरायांचा वारसा सांगता ना रे…
खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन
शेवटच्या रांगेत बसलात रे????#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला
अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला
तुम्ही यातलं… pic.twitter.com/9pr7sDwwqX— Naresh Mhaske (@nareshmhaske) August 8, 2025
शिंदे सेना बरसली
शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी देखील ठाकरेंवर टीका करत म्हटलं, काँग्रेसने तुमची ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे… तुमच्यापेक्षा लहान पक्षांनाही पुढच्या रांगेत बसवलं गेलं, पण महाराष्ट्राचे प्रतिनिधी असलेले तुम्ही मात्र शेवटच्या रांगेत बसलात. दिल्लीत जाऊन तुम्ही राज्याची लाज घातलीत.