टीम इंडियासाठी बॅडन्यूज! दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू आशिया कपमधून बाहेर?, कधी होणार वापसी

टीम इंडियासाठी बॅडन्यूज! दुखापतीमुळे ‘हा’ स्टार खेळाडू आशिया कपमधून बाहेर?, कधी होणार वापसी

Asia Cup 2025 India : आशिया कप क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यास अजून (Asia Cup 2025) एक महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. 9 सप्टेंबरपासून युएईत आशिया कप स्पर्धा सुरू होणार आहेत. या स्पर्धा सुरू होण्याआधीच टीम इंडियाला (Team India) धक्का देणारी बातमी धडकली आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडू शकतो. फक्त हीच स्पर्धा नाही तर यानंतर होणाऱ्या वेस्टइंडिज विरुद्धच्या (IND va WI) मालिकेतही पंत खेळणार नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पंतला दुखापत झाली होती. तरीदेखील या सामन्यात पंतने फलंदाजी केली होती. पाचव्या कसोटीत मात्र पंत खेळला नव्हता.

आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत युएईत होत आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएई विरुद्ध होणार आहे. यानंतर 14 सप्टेंबरला टीम इंडिया पाकिस्तानला भिडणार आहे. साखळी फेरीतील भारतीय संघाचा अखेरचा सामना 19 सप्टेंबरला ओमानशी होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार ऋषभ पंत आशिया कपमधून बाहेर पडला आहे.

Asia Cup 2025 : भारत- पाकिस्तान सामना रद्द होणार? जाणून घ्या सर्वात मोठी अपडेट

इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पंतला दुखापत झाली होती. क्रिस वोक्सचा एक चेंडू पंतच्या डाव्या पायाच्या बुटावर आदळला होता. वेगातील चेंडूमुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी पंतला मैदानाबाहेर जावे लागले होते. स्कॅन केल्यानंतर लक्षात आले की पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर आहे. तरीदेखील पंत काही वेळाने पुन्हा फलंदाजीला आला होता. याच अवस्थेत त्याने अर्धशतक झळकावले होते. यानंतरच्या पाचव्या कसोटी सामन्यात मात्र पंतला विश्रांती देण्यात आली होती. आता पायाचे दुखणे बरे व्हायला किमान दीड महिना लागेल असे सांगण्यात आले.

ऋषभ पंत कधी वापसी करणार?

दरम्यान, फक्त आशिया कपच नाही तर त्यानंतरच्या वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेतही पंत खेळण्याची शक्यता कमीच आहे. ही मालिका 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. भारत दौऱ्यावर वेस्टइंडिज क्रिकेट टीम दोन कसोटी सामने खेळणार आहे. यानंतर टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दौरा आहे. या दौऱ्यात मात्र ऋषभ पंत वापसी करू शकतो. या दौऱ्यात तीन एकदिवसीय आणि पाच टी 20 सामने होणार आहेत. जर पंत या दौऱ्यात खेळला नाही तर त्यानंतर होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यात पंत खेळू शकतो. या मालिकेत दोन कसोटी सामने होणार आहेत.

आता बीसीसीआयला प्रश्न विचारुच नका, सरकारने कायदाच बदलला; काय घडलं?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube