आता तर हद्दच झाली! ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने केला मंत्री बावनकुळेंचा सत्कार; मंत्र्यांनीही केला स्तुतीसुमनांचा वर्षाव

आता तर हद्दच झाली! ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने केला मंत्री बावनकुळेंचा सत्कार; मंत्र्यांनीही केला स्तुतीसुमनांचा वर्षाव

Tuljapur Drugs Case : मंत्र्यांचे जाहीर सत्कार आणि भाषणं ही काही नवी गोष्ट नाही. पण जर एखाद्या अट्टल गुन्हेगाराने मंत्र्याचा सत्कार केला अन् मंत्र्यानही त्याचा जाहीर कौतुक केलं तर… असाच धक्कादायक आणि तितकाच संताप आणणारा प्रकार तुळजापुरात घडला आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा (Chandrashekhar Bawankule) सत्कार तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख (Tuljapur Drugs Case) आरोपी आणि मटका किंग विनोद गंगणेच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे, मंत्री बावनकुळे यांनी त्याला आपुलकीने जवळ बोलावून त्याच्यवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. या प्रकाराने राज्यातच खळबळ उडाली असून विरोधकांनी बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण राज्यात गाजलं. याच प्रकरणात विनोद उर्फ पिंटू गंगणे आरोपी होता. सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे. या गंगणेला कार्यक्रमात मानाचे पान देण्यात आले. या आरोपीनेही मग जोरदार शक्तीप्रदर्शन केले. चक्क मंत्री बावनकुळे यांचा सत्कार केला. यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी ‘विनोद इकडे ये’ असे म्हणत त्यांच्या खांद्यावर हात ठेवला त्याचं कौतुक केलं आणि त्याला शाबासकीची थाप दिली.

नागपूरमधील कार्यक्रमात धक्कादायक घटना; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने पोलिसांना दमदाटी

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे काल धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील तुळजापुरात मंत्री बावनकुळे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला 1865 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जामिनावर बाहेर असलेला विनोद गंगणे देखील उपस्थित होता. इतकेच नाही तर या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर देखील गंगणेचं नाव होतं. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरुवातीपासूनच होती. बावनकुळेंच्या दौऱ्यानिमित्त ही गोष्ट अधोरेखित झाल्याची चर्चा कार्यक्रमस्थळी सुरू होती.

बावनकुळेंचं माध्यमांसमोर तोंडावर बोट

या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी चंद्रशेखर बावनकुळेंना गाठलं. या प्रकारावर प्रतिक्रिया विचारली. बावनकुळेंनी मात्र यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही. सकाळी बोलू असे म्हणत वेळ मारून नेली. यानंतर विरोधकांनी टिकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. ड्रग्ज प्रकरणात जामिनावर सुटलेला आरोपी आपला सत्कार करतो, आपण त्याची स्तुती करता. चष्म्याचा नंबर तर आपल्यालाच बदलावा लागणार आहेच सोबत च्यवनप्राशही खावा लागेल अशी खोचक टीका दानवे यांनी केली आहे.

काय तुळजापूर ड्रग्ज प्रकरण?

तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणाची चर्चा राज्यात आहे. यात तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांची नावं समोर आली होती. विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली होती. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजा यांनी मंदिरातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांची यादी मागवली होती. या प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी असून यातील 21 जण फरार आहेत. पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.

मोठी बातमी! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी बडा मासा गळाला; माजी उपसभापती जमदाडेला बेड्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube