नागपूरमधील कार्यक्रमात धक्कादायक घटना; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने पोलिसांना दमदाटी

नागपूरमधील कार्यक्रमात धक्कादायक घटना; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या नावाने पोलिसांना दमदाटी

Threat Name of Minister Chandrashekhar Bawankule : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्या तीन इसमांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराची तातडीने गंभीर दखल घेत स्वतः पालकमंत्री बावनकुळे यांनी या आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या घटनेबाबत पालकमंत्री (Bawankule) बावनकुळे यांच्या कार्यालयाने रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने 3 ऑगस्ट रोजी, नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या कामठी मार्गावरील ईडन ग्रीन्स लॉन येथे काही लोकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, याठिकाणी पोलिसांनी परवानगी देताना आखून दिलेल्या अटी व शर्थीचे पालन करण्यात आले नाही.

राहुल गांधी वेडे झाले आहेत त्यांना प्रशिक्षणाची गरज; मंत्री बावनकुळेंचा हल्लाबोल

यामध्ये पोलीस याठिकाणी कार्यवाहीसाठी गेले असता आरोपी वेदांत छाबरिया रा. नागपूर, रितेश चंद्रशेखर भदाडे, रा. वाडी, आकाश बनमाली सालम यांनी पोलिसांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने दमदाटी केली. या घटनेचा व्हिडीओ मंगळवारी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार बावनकुळे यांच्या लक्षात आला. त्यांनी तातडीने पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्याशी बोलून सबंधित इसमांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

तसंच, या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्री बावनकुळे यांच्या कार्यालयाने जुनी कामठी पोलीस ठाण्यात या घटनेबाबत तक्रार देखील दाखल केली. त्यानुसार उपरोक्त तीन आरोपींविरुद्ध 293, 221, 223 सहकलम 33(A), (W), (¡¡¡), 1 31, 1 35 म.पो.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube