राहुल गांधी वेडे झाले आहेत त्यांना प्रशिक्षणाची गरज; मंत्री बावनकुळेंचा हल्लाबोल

Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi : राहुल गांधी वेडे झाले आहेत. ते कधी निवडणूक आयोगावर, कधी सैन्यावर बोलतात. त्यांना अजून या देशाची दिशा कळालेली नाही. अशी टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी काँग्रेस (Congress) खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज माध्यमांशी बोलत होते.
माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी वेडे झाले आहे. ते कधी निवडणूक आयोगावर तर कधी सैन्यावर बोलतात. त्यांना अजून या देशाची दिशा कळालेली नाही. त्यांना काही दिवस प्रशिक्षणाची गरज आहे. जर विदेशात चांगले प्रशिक्षण मिळत असेल तर त्यांनी एकदा विदेशात जाऊन यावे. अन्यथा,आमच्याकडे देखील चांगल्या प्रशिक्षण संस्था आहेत. त्यांनी आम्हाला सल्ला मागितला तर कुठे जायचे याबाबतचा सल्ला आम्ही राहुल गांधींना देऊ शकतो. अशी टीका राहुल गांधींवर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
मराठी भाषा ही आमच्या रक्तातील भाषा
तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना मराठीच्या मुद्यावरून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठी भाषा ही आमच्या रक्तातील भाषा आहे. मराठी भाषा महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम राज्य करणारी भाषा आहे. मराठी भाषेसाठी आम्ही सर्वजण एकाच विचाराचे आहोत. मात्र, हिंदी भाषा बोलणाऱ्या व्यक्तीवर आपण कोणत्याही प्रकारची बोली भाषेवरील बंदी आणू शकत नाही. मराठीसोबत हिंदी बोलणाऱ्यांवर मारहाण करणे, हे राज्याला शोभणारे नाही. मराठी आपली भाषा आहे, पण त्याचसोबत हिंदीचाही सन्मान केला पाहिजे. असं माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी
तसेच आगामी निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत देखील आम्हाला 51.78 टक्के मते मिळाली. राज ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय तयारी केली आहे, हे मला माहीत नाही. मात्र आमची तयारी पूर्ण झाली आहे. कोणीही आले आणि लढले तरीही 51 टक्के मते महायुतीलाच मिळणार आहेत. काँग्रेस, शरद पवार यांचा पक्ष किंवा ठाकरे यांचा पक्ष यांना एकही जागा मिळणार नाही. कारण जनतेने ठरवले आहे की देशात नरेंद्र मोदी देशाला समृद्ध करत आहेत आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा विकास करत आहेत. त्यामुळे जनता विकासाच्या बाजूनेच जाणार असा विश्वास देखील यावेळी त्यांनी व्यक्त केला.
ओव्हल कसोटीत सिराज-कृष्णा चमकले, भारताचा शानदार विजय