Download App

प्रजासत्ताक रक्षणासाठी तुमचं रक्त नको, मत द्या; ठाकरेंचे आवाहन

ठाणे : प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको तुमचे मत द्या, असा मताचा जोगवा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जैन धर्मियांसमोर मागितला. यावेळी जैन धर्मिय सदैव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन जैन धर्मगुरूंनी उद्धव ठाकरे यांना दिले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जैन धर्मियांच्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली. तसेच आज जैन मंदिर येथे जाऊन देखिल दर्शन घेतले. तुम्ही रक्त मागितले तरी ते द्यायला तयार असल्याचे कार्यक्रमातील एका आयोजकाने भाषणात जाहीर केले.

त्यावेळेस उद्धव यांनी त्यांच्या भाषणात प्रजासत्ताकाची रक्षा करायची असेल तर रक्त नको मत द्या.. असे म्हणाले. यावेळेस जैन धर्मगुरूंचे आशिर्वाद उद्धव यांनी घेतले. त्यावेळेस धर्मगुरूंनी त्यांना सैदव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन दिले.

स्व. आनंद दिघे यांच्या शुक्रवारी असलेल्या जयंतीपूर्वी उद्धव ठाकरेंनी ठाण्यात हजेरी लावली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील शुक्रवारी ठाण्यात असून तेही दिघे यांच्या समाधीस्थळी जातील अशी शक्यता आहे. यावेळी, उद्धव ठाकरेंनी जैन धर्मीयांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, यावेळी बोलताना ठाणेकरांना एक आवाहनही केले.

दरम्यान ठाकरे यांनी आज ठाण्यात शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. टेंभी नाका येथील धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. उद्धव ठाकरेंनी येथील सभेत बोलताना नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर निशाणा साधला.

Tags

follow us