Download App

Uddhav Thackeray ची ‘ती’ एक चूक; शिवसेना नावासह चिन्ह गमावले

  • Written By: Last Updated:

मुंबई :  शिवसेना पक्षाच्या घटनेत 2018 मध्ये झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले. तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. पण 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत.

शिवसेना पक्षाने 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, असे निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवले आहे. पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)  नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला.

1999 पहिल्यांदा निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आले कि शिवसेना पक्ष प्रमुख या पदाला कुठली हि लिमिट नाही हे लोकशाहीमध्ये चुकीचं आहे. त्यानंतर आयोगाने 1999 शिवसेना पक्ष प्रमुख पद काढून घेतले त्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख हे पद बाळासाहेब वापरत होते. परंतु त्यांनी निवडणूक आयोगाला तसे लेखी कळवले होते. नेमकं हीच चूक उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  केली, पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाला कळवले नाही आणि पक्ष व चिन्ह गमावून बसले.

GST Council : राज्यांना 5 वर्षांचा संपूर्ण जीएसटी दिला जाणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

निवडणूक आयोगाचा निकाल

केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षाला दिले. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगासमोर पक्ष आणि निवडणूक चिन्हावरील दाव्याबाबत सुनावणी झाली होती. निवडणूक आयोगाने आपला निकाल सुनावताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांच्या नेतृत्वातील पक्षाने केलेली एक चूक अधोरेखित केली आहे. या एका चुकीमुळे ठाकरे यांचा पक्षावरील दावा कमकुवत झाला असल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिल्याने आता मागील सहा दशकांपासून ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेना हे नातं आता संपुष्टात आले आहे.

follow us