Download App

..पण भरलेल्या ताटाशी कधी प्रतारणाही केली नाही, दानवेंच्या समारोप प्रसंगी उद्धव ठाकेंचा शिंदेना टोला

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेचा कार्यकाल संपला. त्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलले.

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray on Ambadas Danve farewell : शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज विधान परिषदेतला कार्यकाल पूर्ण झाला म्हणून त्यांच्या निरोप समारंभ विधान परिषदेच्या सभागृहात झाला. यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जोरदार टोले लगावले. ठाकरे बोलायला उभा राहिले तेव्हाच दानवे यांचं नाव घेत म्हणाले अंबादास (Danve) तुम्ही जोरात ‘मी पुन्हा येईल असं म्हणा’ यावर चांगलाच हशा पिकला. तसंच, अंबादास हे काही तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नाहीत. परंतु, त्यांनी कधी भरलेल्या ताटाशी प्रतारणाही केली नाही असा थेट टोला उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांना लगावला. यावेळी शिंदे सभागृहात उपस्थित होते. ठाकरेंच्या या वक्तव्यानंतरही चांगलाच हशा पिकला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचं तोंडभरून कौतूक केलं. अंबादास हे एक मोठे कल्पक आहेत. मी त्यांनी पहिल्यापासून पाहत आलोय. ते कायम काहीतरी कल्पक करत असतात. ठाकरे यांनी मृणाल गोरे, केशवराव धोंडगे यांच्या आठवणी काढत त्यांच्या कामाशी दानवे यांच्या कामाची तुलना केली. त्यासोबत विरोधी पक्षनेता कसा असावा हे सांगताला पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीसांना शालजोडे लगावले. विरोधी पक्षनेता आक्रमक असावा आक्रसताळा नसावा. आपल्याला आक्रसताळेपणाचा आणि आक्रमकपणाचा फरक करता येत नाही असं म्हणत त्यांनी अनेकांना पुन्हा लक्ष केलं. त्यासोबत अनेकदा मोठ्या मोठ्या घोषणा होत असतात. परंतु, प्रत्यक्ष मदत करता आली पाहिजे. ती अंबादास दानवे करत आले आहेत असं म्हणत अंबादास हे निस्वार्थी कार्यकर्ते आहेत अशा शब्दांत त्यांची स्तुती केली.

महायुती सरकारच्या काळात 2 हजार 866 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अंबादास दानवे सभागृहात आक्रमक

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, आज काहीजण दानवे यांचे कौतुक करत आहेत, पण त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले तेव्हा यांचे चेहरे कसे पडले होते, हे मला माहित आहे. अंबादास यांना भाजपच्या तालमीत तयार केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, पण तुम्ही माझे काही नेले आहे, त्याचे आभार तुम्ही मानणार का? असा टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला. काही लोक सोन्याचा चमचा घेऊन जन्मले नाहीत, पण काहीजण भरलेल्या ताटातून उधळत निघाले. पद मिळाले नाही म्हणून दुसऱ्याच्या रेस्टॉरंटमध्ये गेले. यामुळे शिंदे गटावर निशाणा साधला. ठाकरे यांनी अंबादास यांनी कधीही भरलेल्या ताटाशी विश्वासघात न केल्याचं सांगितलं.

follow us