मुंबई : आमदारांना फोडून भाजपने ठाकरेंची सत्ता घेतली… जनता धडा शिकवेल!सोबत गेलं तर धुतलं तांदूळ अन् आमच्यासोबत तांदळाचे खडे, हा कुठला न्याय या शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं आहे. ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेशी ऑनलाईन संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
ठाकरे म्हणाले, टिळक घराण्याचा वापर करुन फेकून दिलं आहे. कसब्यात तुम्ही टिळकांच्या कुटुंबियांना का उमेदवारी नाकारली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित करत टीका केलीय. टिळक घराण्याचा वापर करुन फेकून दिलं तर सहानुभूतीसाठी आश्विनी जगताप यांना चिंचवडमधून उमेदवारी दिली असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.
Sharad Pawar : आमदारांना फोडून भाजपने ठाकरेंची सत्ता घेतली… जनता धडा शिकवेल!
राज्यात असलेलं डबल इंजिन सरकार फक्त धुरांच्या रेषा काढणारं आहे. निवडणूक आयोगाने त्यांना धनुष्यबाण आणि नाव दिलंय. तुम्ही चोरलेला धनुष्यबाण घेऊन या आम्ही मशाल घेऊन येतो, असं चॅलेंजच ठाकरे यांनी विरोधकांनी दिलं आहे.
Ram Shinde: राधाकृष्ण विखेंबाबत शिंदेंचे मोठे विधान, ते आत्ताच भाजपमध्ये…
दरम्यान, पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी आज ऑनलाईन भाषण केलं असून भाषणाच्या सुरुवातीस ठाकरे यांनी दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भुजबळांमधील शिवसैनिक आजही जागा; शिंदे गटाला सांगितली ‘हिंदुत्वा’ची व्याख्या
कसब्यात महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर तर भाजपचे हेमंत रासने यांच्या लढत होणार असून चिंचवडमध्ये भाजपचे उमेदवार आश्विनी जगताप तर महाविकास आघाडीचे नाना काटे यांच्या लढत होणार आहे. या दोन्ही मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचं मानलं जातंय.
सव्वा लाखात लॉन्च झाली ही शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी प्रतिष्ठेची मानली जात असून राज्यातील अनेक दिग्गज नेते या मतदारसंघात आपली ताकद लावताना दिसून येत आहेत.
आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कसब्यात हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ जोरदार रोड शो केला आहे. यावेळी मंत्री रामदास आठवले, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आदी नेत्यांनी हजेरी लावली.
तर दुसरीकडे चिंचवडमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाना काटे यांच्या समर्थनात रोड शो केला आहे. या रोड शोमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.