Udhhav Thackeray Criticize BJP over Ram Mandir donation issue stage ‘Ramraksha’ protest in Dadar : अयोध्येतील राम मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी राम मंदिराच्या निधीबाबत पारदर्शक चौकशीची मागणी करत, या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी 5 जुलै रोजी दादर येथील हनुमान मंदिरासमोर ‘रामरक्षा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.
NAFA Film Festival : महाराष्ट्र शासन आणि ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’, अमेरिका यांच्यात ऐतिहासिक करार!
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीच्या आंदोलनाचा इतिहास आणि त्यामध्ये सहभागी झालेल्या हिंदू समाजाच्या योगदानाचा उल्लेख केला. या आंदोलनातून भाजपला राजकीय बळ मिळाले, मात्र आज त्याच राम मंदिराशी संबंधित निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले. या आरोपांमुळे मंदिराच्या पवित्रतेवर डाग लागल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
मोठी बातमी! शाळांच्या परिसरात स्टिंग एनर्जी ड्रिंक विकण्यास बंदी; मंत्री नरहरी झिरवळांची घोषणा
भाजपवर निशाणा साधताना त्यांनी देशातील विविध राजकीय घडामोडींचा उल्लेख केला. पक्षफोड, आमदारांची फोडाफोड आणि सत्तेसाठी राबवण्यात येणाऱ्या कथित ‘ऑपरेशन्स’चा संदर्भ देत, आता राम मंदिराच्या नावावरही असेच राजकारण सुरू आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मंदिराच्या देणगी निधीबाबत समोर आलेल्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
येत्या 5 जुलै रोजी दादरमधील हनुमान मंदिरासमोर होणाऱ्या ‘रामरक्षा’ आंदोलनात सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. या आंदोलनात रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार असून हा कार्यक्रम कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्नीच्या वाढदिवशी अभिजीत सावंतचं खास गिफ्ट; दिला नवा फ्लॅट, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
दादरमधील आंदोलनानंतर राज्यभरातील राम आणि हनुमान मंदिरांमध्ये अशाच स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित करण्याचा पक्षाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. मंदिर निधीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी भूमिका त्यांनी पुन्हा मांडली.
