मराठी चित्रपटसृष्टीचं जागतिक पाऊल! महाराष्ट्र शासन आणि ‘नाफा फिल्म फेस्टिव्हल’, अमेरिका यांच्यात ऐतिहासिक करार
Maharashtra Government NAFA Film Festival USA मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचललं आहे.
Historic agreement between the Government of Maharashtra and the ‘NAFA Film Festival’, USA : मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (फिल्मसिटी) आणि उत्तर अमेरिकेतील नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (नाफा) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार यापुढे अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘नाफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणार असून, महोत्सवाच्या सर्व अधिकृत प्रसिद्धी व प्रचार साहित्यावर ‘महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने’ असा अधिकृत उल्लेख तसेच शासनाचा अधिकृत लोगो वापरण्यात येणार आहे.
PF मध्ये मोठा बदल! 1,800 रुपयांपेक्षा जास्त योगदान आता ऐच्छिक; नोकरदारांसाठी काय बदलणार?
या संदर्भातील शासन निर्णय (जी.आर.) नुकताच निर्गमित करण्यात आला असून, त्याअंतर्गत महोत्सवासाठी महाराष्ट्र शासन तसेच फिल्मसिटीमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक अधिकारही प्रदान करण्यात आले आहेत.
युझरनेम फीचरबाबत स्पष्टीकरण द्या! व्हॉट्सॲपनंतर, भारत सरकारची टेलिग्राम, सिग्नललाही नोटीस
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे निर्माते अभिजित घोलप यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेली नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन (NAFA) ही उत्तर अमेरिकेतील मराठी आणि भारतीय चित्रपट, संस्कृती व कलावंतांना जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारी स्वयंसेवकांच्या सहभागातून कार्यरत असलेली एक समुदायाधारित, ना-नफा (Non-Profit) संस्था आहे. गेल्या तीन वर्षांत या महोत्सवाने उत्तर अमेरिकेत मराठी चित्रपटसृष्टीसाठी स्वतंत्र आणि प्रतिष्ठित ओळख निर्माण केली आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! आरोपी चेतनच्या वर्गमित्राला पोलिसांनी घेतलं ताब्यात
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने NAFA आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला भारताबाहेरील महाराष्ट्र शासनाचा अधिकृत मराठी चित्रपट महोत्सव म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) आणि मुंबई आंतरराष्ट्रीय माहितीपट, लघुपट व अॅनिमेशन चित्रपट महोत्सव (MIFF) यांच्या धर्तीवर, परंतु भारताबाहेर आयोजित होणारा महाराष्ट्र शासनाशी संलग्न अधिकृत मराठी चित्रपट महोत्सव म्हणून NAFA ची नवी आणि मानाची ओळख निर्माण झाली आहे.
इथेनॉलमुळे खराब होतय गाड्यांचं इंजिन? E20 पेट्रोलवर सरकारची पहिल्यांदाच कबुली
याबाबत NAFA चे संस्थापक-अध्यक्ष अभिजित घोलप यांनी सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने आमच्या प्रस्तावाला दिलेला सकारात्मक प्रतिसाद हा मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद आणि ऐतिहासिक क्षण आहे. NAFA चे उद्दिष्ट केवळ चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणे एवढ्यापुरते मर्यादित नसून, मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती, वितरण, OTT व्यासपीठे, गुंतवणूक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हे आहे. महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य विभाग आणि फिल्मसिटी यांच्या सहकार्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नवे दालन खुले होईल, असा मला विश्वास आहे. मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री मा. अॅड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हासे-पाटील यांनी या उपक्रमाला दिलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक ऋणी आहे.”
याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी सांगितले की, “मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि राज्यातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच निर्मात्यांना आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करून देणे हे महाराष्ट्र शासनाचे प्राधान्य आहे. NAFA सोबतचे हे सहकार्य मराठी चित्रपटसृष्टीच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असून, या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि सर्जनशीलता जागतिक स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचेल.”
या भागीदारीमुळे महाराष्ट्राला होणारे प्रमुख लाभ :
* मराठी चित्रपटांचा उत्तर अमेरिका तसेच जागतिक स्तरावर व्यापक प्रचार व प्रसार.
* आंतरराष्ट्रीय वितरण, OTT व्यासपीठे आणि नव्या बाजारपेठांमध्ये प्रवेश.
* जागतिक चित्रपट महोत्सव, वितरक, गुंतवणूकदार आणि निर्मात्यांशी थेट संपर्काची संधी.
* नवोदित कलाकार, दिग्दर्शक व तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण, नेटवर्किंग आणि प्रदर्शनाची संधी.
* आधुनिक चित्रपटनिर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), वितरण आणि मार्केटिंगविषयक जागतिक अनुभव.
* आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती (Co-production) आणि संयुक्त प्रकल्पांना चालना.
* मराठी भाषा, संस्कृती आणि कलाविश्वाचा जागतिक स्तरावर अधिक प्रभावी प्रचार-प्रसार.
NAFA आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये सुमारे २० ते ३० देशांतील चित्रपट प्रदर्शित होणार असून, चित्रपट निर्मिती, वितरण, सहनिर्मिती, OTT, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि अत्याधुनिक चित्रपटनिर्मिती तंत्रज्ञान या विषयांवरील विविध परिसंवाद, कार्यशाळा, मास्टरक्लास आणि व्यावसायिक सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सरकारवर विश्वास ठेवून नव्हे, एक संधी द्यायची म्हणून… आंदोलन मागे घेतल्यानंतर अण्णांचे स्पष्टीकरण
या ऐतिहासिक भागीदारीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक चित्रपट उद्योगाशी जोडणारा सक्षम आणि दीर्घकालीन दुवा निर्माण होणार असून, कलाकार, निर्माते, तंत्रज्ञ आणि वितरकांसाठी आंतरराष्ट्रीय संधींचे नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाचे मा. सांस्कृतिक कार्यमंत्री, महाराष्ट्र फिल्म, स्टेज अँड कल्चरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, सांस्कृतिक कार्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, फिल्मसिटीचे व्यवस्थापकीय संचालक तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांचे शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.