Download App

महाराष्ट्र सरकारने अहवाल पाठवावा, आम्ही लगेच मदत पाठवतो; अमित शहांची शेतकऱ्यांना मदतीची घोषणा

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवावा.

  • Written By: Last Updated:

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही दिली आहे. (Shah) राज्यातील साठ लाख हेक्टरहून अधिक शेतकऱ्यांची भूमी आणि पिकांचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारने वित्तीय वर्ष २०२५-२६ साठी महाराष्ट्राला ₹३१३२ कोटी रुपये दिले आहेत, त्यापैकी ₹१६३१ कोटी एप्रिलमध्येच वितरित करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र सरकारनेही शेतकऱ्यांसाठी अनेक पुढाकार घेतले आहेत, ज्यात ₹२२१५ कोटींचे मदत पॅकेज आणि ₹१०,००० रोख तसेच ३५ किलो खाद्यान्न देण्याचा समावेश आहे. ई-केवायसीच्या अटी शिथिल करून, शॉर्ट टर्म फायनान्सच्या कर्जाच्या वसुलीवर स्थगिती दिली आहे. भूराजस्व आणि शाळेच्या परीक्षेतही सूट देण्यात आली आहे.

औरंगजेबाच्या पाईक असणाऱ्यांमध्ये ही हिम्मत नाही; अहमदनगरच्या नामकरणावरून अमित शहांचा विरोधकांना टोला

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्र सरकारला पाठवावा, अशी विनंती अमित शाह यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मदत करण्यास जराही उशीर लावणार नाहीत, असे आश्वासन त्यांनी दिले. एनडीएच्या आमदारांनी मुख्यमंत्री मदत निधीत आपला एक महिन्याचा पगार दिला असून, अनेक ट्रस्टही मदतीसाठी पुढे आले आहेत.

महाराष्ट्राचे त्रिमूर्ती जे आहेत, यातून एकही बनिया नाही, मात्र तिघेही बनियापेक्षा पक्के आहेत असं म्हणत काल तिघांनी माझ्यासोबत शेतकऱ्यांसंदर्भात बैठक केली, शेतकऱ्यांना मदतीसाठी मागणी केली, असं अमित शाह यांनी म्हटलं. त्यावेळी, मी म्हणालो, महाराष्ट्र सरकारने अहवाला पाठवावा, आम्ही लगेच मदत पाठवतो. हे होऊ शकतं कारण शेतकऱ्यांची काळजी घेणारं हे सरकार आहे. आपल्या एनडीएच्या सर्वच आमदार-खासदारांनी सीएम रिलिफ फंडामध्ये एक महिन्याचे वेतन देऊन मदत केली आहे, अशी माहितीही अमित शाहांनी दिली.

follow us