Download App

Narayan Rane : भुजबळ मला डिवचू नका… नारायण राणेंचा थेट इशारा

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेतील वाद हा सर्वाना माहिती आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आपल्या विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. मला डिवचू नका. बाळासाहेबांनी काय सांगितलं होतं मला हे सर्वांना सांगेन, असा धमकीवजा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला.

नुकतेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे तैलचित्र विधिमंडळात लावण्यात आले. त्या कार्यक्रमात मंत्री राणे हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावलं आहे. यावेळी बोलताना राणे म्हणाले, बाळासाहेबांनी मला काय सांगितलं हे मी सांगणार नाही. पण मला डिवचू नका, अन्यथा मी सर्व सांगेन असे सांगत मंत्री राणे यांनी कुठे आहे भुजबळ असे विचारले. त्यावेळी छगन भुजबळ हे सभागृहाबाहेर जात होते.

पुढे बोलताना राणे म्हणाले, अनेकवेळा अधिवेशन झाली त्यावेळी मी बाळासाहेबांना सांगितलं की काहीतरी चुकतंय. साहेब वडिलांसारखे होते मात्र मुलासारखे कितीजण वागले हा देखील प्रश्न आहे. या सर्व गोष्टी मी जवळून पहिल्या. साहेबांना मानसिक त्रास हा राज्यातील शिवसैनिकांनी नाही दिला तर कोणी दिला हे सर्वांना माहिती आहे.

बाळासाहेब मला बोलवायचे व सांगायचे फार त्रास आहे. हा त्रास कोणी दिला हे मी सांगणार नाही. पण मला डिवचू नका, नाही तर मी सर्व सांगेन. आमच्या सारखे शिवसैनिक तसेच एकनाथ शिंदे यांच्यासारखे शिवसैनिक यांनी कधी संसार नाही पहिला.

घरात मी मोठा होतो, माझ्या मागे माझी पाच भावंडे होती. पण उद्या काही होईल याचा मी कधी विचार नाही केला. नगरसेवक म्हणून फॉर्म भरायला गेलो तेव्हा माझ्यावर किती केसेस आहे हे विचारलं गेलं. अनेक केसेस माझ्यावर होत्या. मी पैसे मिळवण्यासाठी हे नाही केलं. मात्र बाळासाहेबांविरुद्ध तसेच शिवसेनेविरुद्ध कोणी बोलले तर अद्दल घडलीच समजा.

मात्र आता शिवसेनेविरुद्ध कोणी काही बोलले तरी काही होत नाही. आहेतच कोण? जे काही करणारे होते ते तर गेले आता राहीलच कोण अशा शब्दात त्यांनी प्रत्यक्ष नाव न घेता उद्धव ठाकरे यांना शब्दिका टोला लागवला आहे.

Tags

follow us