Download App

रिपाईला मंत्रिपद द्या! केंद्रीय मंत्री रामदास आठवले मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम…

Ramdas Athavle : शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये रिपाईला मंत्रिपद द्या, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा केली आहे. दरम्यान, राज्यात आधी एकनाथ शिंदेंचं बंड झालं त्यानंतर अजित पवार सत्तेत आले, अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना मंत्रिपदे मिळाली, पण शिवसेना-भाजपचे नेते वेटिंगवर आहेत, पुढील मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईलाही मंत्रिपद द्यावं, अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे.

Letsupp Special : कांद्याला कमी लेखू नका; याने अनेक सरकारे घालवलीत… इंदिरा गांधींपासून मनोहर जोशींना दिलाय धक्का

पुढे बोलताना ते म्हणाले, अजित पवार, एकनाथ शिंदे यासोबतच्या सगळ्यांना मंत्रिपद मिळालं. पण आम्हाला मंत्रिपद मिळालं नाही. आमची मागणी आहे की, आम्हालाही मंत्रिपद द्यावं. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद द्यावं म्हणून सांगितलं. मात्र अजित पवार यांचा विस्तार होईल समावेश होईल. हे आम्हाला ही माहिती नव्हतं. पण तरिही आमची मागणी कायम आहे. आरपीआयला मंत्रिपद मिळावं, असं आठवले म्हणाले आहेत. तसेच अजित पवार यांच्यामुळे युतीच्या मतांवर होणार नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

रोहित पवार, तनपुरेंवर अजितदादांच्या बड्या नेत्यांविरोधात जबाबदारी, तर आव्हाडांची धनंजय मुंडेंशी टक्कर

तसेच आगामी लोकसभा निवडणुकांसंदर्भात आजचा मेळावा आहे. महायुती सोबत आम्ही निवडणूक लढवणार आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरपीआयला चांगल्या जागा मिळणार आहेत. ज्यावेळी निवडणूक होतील, तेव्हा आरपीआयच्या नेत्यांना जनता निवडून देणार असल्याचा विश्वासही आठवले यांनी व्यक्त केला आहे.

आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही? सलग तीन ट्विट करत अजितदादांचे शरद पवारांवर थेट वार

‘इंडिया’ नाव देणं चुकीचं :
विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘INDIA’हे नाव देणं अत्यंत चुकीचं आहे. आघाडीला इंडिया नाव देऊन लोकांना संभ्रम मध्ये टाकू नये. नितीश कुमार, ममता बॅनर्जी, उध्दव ठाकरे हे पंतप्रधानपदासाठी इच्छुक आहेत. शरद पवार हे सुद्धा इच्छूक आहेत. पण लोकांचा विश्वास नरेंद मोदी यांच्यावर आहे. नरेंद मोदी हे जगात पॉप्युलर नेतृत्व आहे. लोकशाहीमध्ये जनता जो कौल देईल हे मान्य आहे.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्यात रिपाईला मंत्रिपद द्या अशी मागणी करीत आहेत. अद्याप त्यांच्या या मागणीवर सत्ताधारी सरकारकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नसून आता येणाऱ्या काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाईला मंत्रिपद मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us