Download App

राज्यात अवकाळीचा कहर, उभी पिकं जमीनदोस्त, शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत

  • Written By: Last Updated:

मुंबई : गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस बरसला तर आता मरडवाड्याला अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अवकाळीने एवढा कहर घातला आहे की सर्वच पिके जमीनदोस्त झाली आहेत. या अवकाळीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झाले आहे. परंतु अजून शेतकऱ्याला नुकसान भरपाई तर सोडाच अजून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे देखील होऊ शकले नाहीत. त्यामुळे कधी पंचनामे होणार आणि कधी सरकारी मदत मिळणार यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

जुन्या पेंशनसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी सध्या बेमुदत संपावर गेले आहेत. एकी कडे सरकारने अवकाळीमध्ये नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत परंतु सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत आहे.

या अवकाळी पाऊसाचा सर्वाधिक फटका गहू पिकाला बसला आहे. कारण गव्हाचे पीक काढणीसाठी आले होते. त्यामुळे हे सर्व पीक अवकाळी पाऊसामुळे जमीनदोस्त झाले आहे. राज्यभरात लाखो हेक्टरवरील शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा, उन्हाळी बाजरी, स्वारी, मिरची, चारापीके, यांचा समावेश आहे.

Bhaskar Jadhav : कॉपी करूनही पेपर सोडवता येत नाही… एवढा रामदास कदम ‘ढ’ आहे! 

उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या सहा ते सात दिवसापासून अवकाळी पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. या भागात सतत पाऊस आणि गारपीट होत आहे. तालुक्यात या गारपिटीमुळे मिरची, गहू, हरभरा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नंदुरबार जिल्ह्यात 5000 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. परंतु अजून देखील शेतकरी पंचनाम्याची प्रतीक्षेत आहेत.

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला अवकाळी पाऊसाचा आणि गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला आहे. यामध्ये. जिल्ह्यातील 12 तालुक्याचा समावेश आहे या गारपिटीमुळे जिल्ह्यातील 24 हजार हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. परंतु अद्याप फक्त 5 ते 10 टक्के पंचनामे झाले आहेत. त्यामुळे कधी पंचनामे होणार आणि कधी सरकारी मदत मिळणार यामुळे शेतकरी चिंतेत आहे.

Tags

follow us