Download App

अवकाळी पावसाचं संकट 2 मे पर्यंत कायम, हवामान विभागाकडून अलर्ट जारी, शेतकऱ्यांची चिंता वाढली

  • Written By: Last Updated:

Unseasonal rain crisis till May 2 : मार्च आणि एप्रिल महिन्यात महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यानंतर आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातही पुन्हा अवकाळी पावसानं (Unseasonal rain) झोपडपून काढलं. राज्यात मागील गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसानं कहर केल्यानं अनेक भागातील शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही अनेक भागात अवकाळी पाऊस सुरूच आहे. अशातच आता प्रादेशिक हवामान विभागाकडून (Meteorological Department) पुढील 3 दिवसांसाठी पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असू्न 2 मेपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटी झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यामध्ये फळबागांचे मोठे नुकसान झालं आहे. दरम्यान, आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, 30 एप्रिल रोजी राज्यातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला. तर मराठावाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि प. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यानंतर 1 ते 3 मे दरम्यान वादळाचा तडाखा बसू शकतो. या दिवशी विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी पाऊस होईल. तसेच राज्याच्या बहुतांश भागात गारपीटही होऊ शकते.

Wrestlers Protest : एफआयआर म्हणजे न्याय नाही, बृजभूषण शरण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

तर एक मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना देखील हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणचा पट्टा सोडत इतर जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला. तर 2 मे रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वारा, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीये.

हवामान विभागाने महाराष्ट्रासह अन्य राज्यातही पावसाचा अंदाज वर्तवला. उत्तराखंडमध्ये 29 एप्रिल ते 2 मे पाऊस होण्याची शक्यात आहे. तर युपी, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये 1 ते 2 मे या दरम्यान गारपीट होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं. तर 30 एप्रिल ते 1 मे दरम्यान झारखंडच्या अनेक भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आता अवकाळी पावसाची आणि वादळी वाऱ्याची स्थिती निर्माण झालेली शेतकऱ्यांनी झाडाखाली थांबू नये, असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

Tags

follow us