Download App

अवकाळीचा मोठा फटका! संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांची पीकं गेली वाहून

Unseasonal Rain ने संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये कांदा, भाजीपाल्यासह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Unseasonal Rain hits farmers hard! Crops of farmers in Sangamner taluka washed away : गेल्या काही दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. आता पुढील पाच दिवसही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची धार सुरुच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आहे. त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात मागील दोन-तीन दिवसापासून अवकाळी पावसाने जोर धरला आहे. सोमवारी सायंकाळी संगमनेर शहरासह पश्चिम व पूर्व भागामध्ये जोरदार पाऊस झाला असून यामुळे कांदा भाजीपाला यांसह साठवलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे.

गुप्तहेर कसा बनवतो, नेटवर्क कसं काम करतं… गुप्तहेर जगताची वाचा A टू Z कहाणी

याचबरोबर काही जनावरे दगावली असून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामे करावे अशा सूचना महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत. तालुक्यातील निमगाव भोजपूर ,निमज, चंदनापुरी, वेल्हाळे, सांगवी, पेमगिरी नांदुरी, राजापूर ,चिकणी,या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. या भागामध्ये डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात असून या अवकाळी पावसाने डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले याचबरोबर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कांदा हा शेतीमध्ये डेपो बनवून साठवला होता. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी साठवलेले कांद्याचे डेपो पूर्णपणे वाया गेले आहे.

भाजप सरकारचा मोठा निर्णय, मदरशांमध्ये Operation Sindoor शिकवले जाणार

दुसरीकडे राज्यातील पुढील पाच दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस (Rain Update) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीयं. अरबी समुद्रात कमी दाब क्षेत्रामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात 20 ते 25 मेदरम्यान अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे.राज्यात आज 20 मे रोजी कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे.

भारत पाकिस्तानच्या वादात बांग्लादेशची चांदी; एलन मस्कच्या कंपनीशी मोठी डील, काय घडलं?

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आलायं.

follow us