मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानाने मूड बदलला आहे. अनेक भागांत अवकाळी पावसाची (unseasonal Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. आजही राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
महात्मा गांधींच्या नात उषा गोकाणींचं निधन
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 25 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज हवमान विभागाकडून वर्तवण्यात आला असून आजही पावसाच्या हलक्या सरी पडणार आहेत.
उत्तर आणि पश्चिम महारष्ट्रानंतर अर्थिक राजधानी मुंबईलाही अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. काल मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरांत मुसळधार पाऊस बरसला आहे.
‘मी पंतप्रधान मोदींना विनंती करेन…’, माजी पाकिस्तानी कर्णधार आफ्रिदीचं मोठं विधान
तर राज्यातील इतरही भागांत हलक्या स्वरुपात पाऊस पडल्याची माहिती समोर आलीय. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईतील चाकरमान्यांना फटका बसल्याचं दिसून आलं.
या अवकाळी पावसाचा राज्यातील शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात झळ बसत असून शेतकऱ्यांच्या फळबागा, गहु, ज्वारी, द्राक्षे, टरबूज, खरबूज पिकांना मोठा फटका बसला आहे.
अमृतपाल वेशांतर करुन पळाला; टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट ओढावल्याने शेतकरी वर्ग चांगलाच हवालदिल झाला असून विरोधकांकडून शेतकऱ्यांनी भरीव मदत करण्याच्या मागणीसाठी वेठीस धरण्यात येत आहे.
दरम्यान, येत्या 25 तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने आता उरलं सुरलं पिकांच्याही नूकसानाला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.