महात्मा गांधींच्या नात उषा गोकाणींचं निधन

Usha Gokani Mahatma Gandhi

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नात उषा गोकाणी यांचं निधन झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून उषा गोकाणी आजाराने ग्रासल्या होत्या.

दोन वर्षांपासून त्या अंथरुणात खिळून होत्या. अखेर 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. याबाबत अधिकृत माहिती मणि भवनचे कार्यकारी सचिव मेघश्याम अजगावकर यांनी दिलीय.

विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला इशारा, विखे खळखळून हसले

महात्मा गांधी स्मारक निधी मुंबईच्या उषा गोकाणी माजी अध्यक्ष होत्या. त्यांचं बालपण वर्धा इथल्या सेवाग्राममध्ये गेलं असून 2 ऑक्टोबर 2015 रोजी मणिभवन हे तत्कालीन गांधी मेमोरियल सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आलं आहे.

अन् एकेदिवशी गुजरातला देशाची आर्थिक राजधानी घोषित केले जाईल…जयंत पाटलांनी व्यक्त केली भिती

मणिभवन हे स्वातंत्र्यलढ्याचा ऐतिहासिक साक्षीदार असून इथेच महात्मा गांधी अनेक वर्ष वास्तव्यास होते. मणिभवनमध्येच गांधी स्मारक निधी आणि मणि भवन गांधी संग्रहालय या संस्था आहेत.

उषा गोकाणी महात्मा गांधी स्मारक निधीच्या अध्यक्ष होत्या. काल मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली असून उषा गोकाणी यांच्या निधनाने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube