अमृतपाल वेशांतर करुन पळाला; टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

अमृतपाल वेशांतर करुन पळाला; टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर

चंदिगड : खलिस्तान (Khalistan)समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh)चार दिवसांपासून पंजाब पोलिसांना (Panjab Police)चकमा देत आहे. त्याला पकडण्यासाठी राज्यभरात हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अमृतपाल एका टोलनाक्यावरील (Toll Plaza) सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजमध्ये(CCTV Footage) दिसत आहे. शनिवारी सकाळी 11:27 वाजता जालंधरच्या (Jalandhar)टोल प्लाझावर बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 30 वर्षीय कट्टरपंथी उपदेशक दिसला होता. तो मारुती ब्रेंझा कारच्या पुढच्या सीटवर बसलेला दिसत आहे.

त्याआधी अमृतपाल सिंग शनिवारी एका मर्सिडीज एसयूव्हीमध्ये शाहकोटमधील सिंगल-लेन रस्त्यावरून जाताना दिसला होता. मिळालेल्या माहितीनुसार, काही तासांनंतर, हा वारीस पंजाब दे प्रमुख मारुती ब्रेंझामध्ये दिसला. त्याने कारमध्येच कपडे बदलल्याचे सांगितले जात आहे.

12 आमदारांच्या नियुक्तीबाबतचा स्थगिती आदेश पुढील तारखेपर्यंत कायम

अमृतपाल वेशांतर करुन पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने शाहकोटमध्ये कपडे बदलले. येथे त्याने पँट-शर्ट आणि गुलाबी फेटा घातला आणि दुचाकीवरून पळ काढला. तत्पूर्वी ते ब्रेझा कारमधून नांगल आंबिया येथील गुरुद्वारा साहिबलाही गेले होते. त्याने येथे जेवणही केल्याचे सांगितले जात आहे.

सुखदीप आणि गौरव नावाच्या दोघांनी अमृतपालला दोन दुचाकी दिल्या होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यापूर्वी अमृतपालचे नवीन सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तो टोल प्लाझावर गाडीतून जाताना दिसत आहे.

हे व्हिडिओ फुटेज शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यानचे आहे. दुसरीकडे, पंजाब पोलिसांनी अमृतपालविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी त्याच्या काकांसह पाच जणांवर NSA कायद्यांतर्गत गुन्हा लावण्यात आला आहे.

पंजाब पोलिसांचे आयजी सुखचैन सिंग गिल यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात अमृतपाल सिंग नांगल अंबिया गावात असलेल्या गुरुद्वारा साहिबमध्ये गेल्याचे समोर आले आहे. येथे अमृतपाल कपडे बदलून दोन मोटारसायकलवरून पळून गेला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर मदत करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube