Download App

युपीएससीने परमिशन दिली अन् नावात बदल; पूजा खेडकर स्पष्टच म्हणाल्या

Pooja Khedkar Exclusive : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी लेट्सअप (LetsUpp Marathi) विशेष

Pooja Khedkar Exclusive : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी लेट्सअप (LetsUpp Marathi) विशेष या कार्यक्रमात खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये बोलताना पूजा खेडकर यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. तर नाव बदलून युपीएससी परीक्षा दिली का? या प्रश्नावर देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत मी माझ्या नावात 2014 मध्ये लीगली आईंच नाव ऍड केलं असल्याची माहिती दिली.

या प्रश्नावर उत्तर देत पूजा खेडकर म्हणाल्या की, माझं नाव पहिल्यापासूनच पूजा खेडकर होते आणि भविष्यात देखील होप फूली हेच नाव राहणार आहे. मी माझ्या नावात कुठलाही बदल केलेला नाही फक्त मी 2014 मध्ये माझ्या नावापुढे माझ्या आईंच नाव लावलं आहे. यूपीएससीच्या फॉममध्ये एक जागा असते जिकडे मॅट्रिकुलेशन सर्टिफिकेटनुसार नाव लिहावे लागते. माझ्या मॅट्रिकुलेशनच्या सर्टिफिकेटवर खेडकर पूजा दिलीपराव असं नाव आहे. यूपीएससीचा फॉर्म भरताना मला ते नाव वापरावे लागले आहे. मात्र मी अनेकदा प्रयत्न केले की, माझं जे गॅझेट नोटिफिकेशनमध्ये नाव आहे. ते मला वापरता यावे. याबाबात मी अनेकदा यूपीएससीकडे विनंती देखील केली.

17  मार्च 2021 मध्ये मला यूपीएससीकडून मेल आला आणि त्यांनी मला माझ्या गॅझेटनुसार नाव वापरण्याची परवानगी दिली आणि त्यानंतर मी फॉर्म भरला आणि या फॉर्ममध्ये पूजा मनोरमा दिलीप खेडकर असं नाव वापरले. त्यामुळे माझ्यावर नाव बदलण्याचे जे आरोप होत आहे ते चुकीचे आहे. मला नाही वाटत की आपल्या नावामध्ये आईचं नाव लावणं हे काही चुकीचं आहे.

Dhananjay Munde : सगळ्या त्रासापासून वाचण्यासाठी धनंजय मुंडे नक्की गेलेत कुठे? 

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील आपल्या नावामध्ये आईचं नाव लावले आहे. जर फक्त जास्त युपीएससी अटेम्ट देण्यासाठी नाव बदलण्याचा माझा प्रयत्न होता तर मी युपीएससीला का? याबाबात माहिती दिली असती. मी आईंच नाव कशाला लावल असत. मी पूजाच पल्लवी केलं असतं असं या मुलाखतीमध्ये पूजा खेडकर म्हणाल्या.

follow us