Utkarsha Rupwate : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाची तरतूद वगळण्यात आल्याप्रकरणी आज जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांची अहिल्यानगर येथे उत्कर्षा रुपवते (Utkarsha Rupwate) यांनी भेट घेत आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या भरती प्रकिया थांबविण्याची मागणी केली. तसेच त्यांनी वंचित – शोषित घटकांवर अन्याय होऊ नये असा आग्रह देखील पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे धरला.
उत्कर्षा रुपवते यांनी संविधानिक मार्गाने जो पर्यंत भरतीची प्रक्रिया राबवली जात नाही, तो पर्यंत भरती थांबविण्याची मागणीही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली. यावेळी समवेत वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफ भाई शेख, शहर महासचिव अमर निरभवने, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा सल्लागार जे.डी. शिरसाठ, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, नेवासा तालुकाध्यक्ष पोपट सरोदे, राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके आदी उपस्थित होते.
कोरोना व्हायरस चिनी प्रयोगशाळेतूनच लीक, CIA ने केला मोठा दावा
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्हा अहिल्यानगर यांनी बँकेत 700 नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र या भरतीमध्ये एससी, एनटी, व्हिजेएनटी, ओबीसी, एसबीसी, यांची जागा रिक्त असतानाही सर्व नोकर भरती आरक्षणाशिवाय करण्यात येत आहे असा आरोप बँकेवर करण्यात येत आहे. तर आम्हाला महाराष्ट्र शासनाने आरक्षणाशिवाय नोकर भरती करण्याची परवानगी दिली आहे. असा दावा बँकेकडून करण्यात येत आहे.
‘बुढ्ढे ड्युटी करनी आती क्या?, 2 तासांत सस्पेंड करतो’, पोलिसांना धमकी देणाऱ्या बाकलीवालला मोठा दणका