Download App

उत्तम जानकरांची आमदारकी धोक्यात, जात प्रमाणपत्र प्रकरणात नोटीस; जाणून घ्या प्रकरण

Uttamrao Jankar : ईव्हीएममशीन विरोधात आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) माळशिरसचे (Malshiras) आमदार

  • Written By: Last Updated:

Uttamrao Jankar : ईव्हीएममशीन विरोधात आंदोलन करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) माळशिरसचे (Malshiras) आमदार उत्तम जानकर (Uttamrao Jankar) पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चेत आले आहे. आमदार उत्तम जानकर यांना जात प्रमाणपत्र प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) नोटीस बजावली आहे. संकल्प डोळस (Sankalp Dolas) यांनी उत्तम जानकर यांच्या जात प्रमाणपत्राबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

30 जुलैला सुनावणी

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये उत्तम जानकर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माळशिरस राखीव मतदार संघातून हिंदू खाटीक या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवून विजयी झाले होते. त्यानंतर माजी आमदार हणमंत डोळस यांचे पुत्र संकल्प डोळस यांनी उच्च न्यायालयात धाव घेत उत्तम जानकर यांचा जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. या प्रकरणात आता 30 जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने आमदार जानकर यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती संकल्प डोळस यांनी दिली आहे.

जातीची खोटी प्रमाणपत्रे घेऊन अनुसूचित जातीच्या जागेवर उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली असा आरोप संकल्प डोळस यांनी या याचिकेत केला आहे. त्यामुळे आता उत्तम जानकर यांची आमदारकी धोक्यात आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.

काय म्हणाले संकल्प डोळस?

या प्रकरणाची माहिती देत संकल्प डोळस म्हणाले की, माळशिरस तालुक्याचे सध्याचे आमदार खोट्या दाखल्यावरती निवडून आले आहेत. त्यांनी सर्वसामान्या मागासवर्गीय समाजामध्ये अतिक्रमण केला आहे. या अतिक्रमाविरोधात माजी आमदार हणमंत डोळस यांनी हा लढा मागच्या पंधरा वर्षांपासून सुरु ठेवला होता. त्यांच्या या लढ्याला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या लिबर्टीचा वापर करुन न्यायालयात पुनर्विचार याचिका मी दाखल केली होती.

कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण व्हावीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश 

मागच्या दहा दिवसांअगोदर याबाबत सुनावणी झाली असून आमचा मोठा विजय झाला आहे. उत्तम जानकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि 30 जुलैला या प्रकरणात सुनावणी होणार असल्याची माहिती संकल्प डोळस यांनी दिली.

follow us