पंढरपुरच्या घोड्यासारखाच तुमचा परतीचा प्रवास; उत्तम जानकरांनी आमदार मानेंना धुतलंच
Uttam Jankar News : पंढरीच्या विठुरायाकडून घोड्याचा परतीचा प्रवास जसा होतो, अगदी तसाच तुमचाही प्रवास होणार असल्याचं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी विरोधकांना धुतलंय. दरम्यान, सोलापुरातील मोहोळमध्ये आज राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जानकरांनी विरोधक नेत्यांसह आमदार यशवंत माने यांच्यावर निशाणा साधलायं.
त्यावेळी फडणवीस साहेब जन्मालादेखील आले नव्हते; डोक्याला हात लावत भुजबळांनी दिलं उत्तर
उत्तम जानकर म्हणाले, आता राज्यात परिवर्तन होणार आहे. कितीही केलं तरीही ज्यांना आपण मालक केलं, ज्यांना आपल्या ताटात जेवायला घातलं तेच आज आपल्या ताटात सू करुन जात आहेत. पण मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्यांच्या मनात शरद पवार यांचा विचार आहे. पवारांसोबत मोहोळ तालुका कायमच राहिलायं, इथल्या मालकाला वाटतंय की आपल्य पालखीसोबत घोडा आहे, त्यामुळे लोकं आपल्या पाया पडत आहेत, पण ज्यावेळी पालखी पंढरीच्या विठुरायाकडे जाते तेव्हा घोड्याचा ताज काढला जातो अन् चाबुक घेऊन त्याचा परतीचा प्रवास सुरु होतो, अगदी तसाच विरोधकांचाही प्रवास सुरु होणार असल्याचं उत्तम जानकरांनी भाकीत केलंय. यावेळी बोलताना जानकरांनी आमदार यशवंत माने यांचं नाव न घेता टीका केलीयं.
Video : उद्भवलेली समस्या सोडवायची असेल तर, धोरण बदला; पवारांची मोदींकडे मोठी मागणी
तसेच राज्यकर्ता लोकांच्या सोयीसाठी काम करीत असतो. कुठल्याही राज्यकर्त्याला आपलं बलस्थान कायम रहावं आपली सत्ता अबाधित रहावी असं वाटत असतं. तुम्ही आता वेळीच सावध व्हा गेल्या दोन महिन्यापूर्वीच 63 हजार लोकांनी चाबकाचे फटके मारले आहेत, आता ते वळ 70 हजारावर जाऊ देऊ नका, या शब्दांत जानकरांनी विरोधकांना दम भरलायं. सामान्य माणसांची नस ओळखली पाहिजे म्हणून तुम्हाला अजून दोन महिने संधी आहे. मालकाचा गडी व्हायला वेळ लागत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
मारुतीच्या कार्सवर बंपर डिस्काउंट, Wagon R खरेदीवर होणार 67 हजारांची बचत
फडणवीस-अजितदादांना इशारा…
राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला 20 हजारांमधल्या 19 हजार खुर्च्या मोकळ्या होत्या. अजूनही हातात वेळ आहे, मी बारामती आणि नागपूरकरांना इशारा देतोयं, धनगर आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर राज्यातून तुम्ही हद्दपार व्हाल, जनता तुम्हाला घरचा रस्ता दाखवणार असल्याचं उत्तम जानकरांनी स्पष्ट केलंय.