Video : उद्भवलेली समस्या सोडवायची असेल तर, धोरण बदला; पवारांची मोदींकडे मोठी मागणी
पुणे : मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढवली पाहिजे. त्याचे अधिकार केंद्राला आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर तोडगा काढायचा असेल तर, धोरण बदला अशी मोठी मागणी शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकराकडे केली आहे. केंद्र सरकारने ही मर्यादा वाढवली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, असेही पवार म्हणाले. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. (Sharad Pawar Demand To Raising 50 % Quota Cap)
शरद पवारांचा राज ठाकरेंवर जोरदार पलटवार; म्हणाले, मी या रस्त्याने कधी जात नाही, मला महाराष्ट्र
पवारांकडून तामिळनाडूचा उल्लेख अन्…
आरक्षणाबाबत बोलताना पवार म्हणाले की, आज 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येणार असा निर्णय कोर्टाने दिलेला आहे. तामिळनाडूत 73 टक्क्यांच्या आसपास आरक्षण दिलं होतं. तो निर्णय कोर्टात टिकला होता असेही पवार म्हणाले. त्यानंतर कोर्टात जे निर्णय दिले ते निकाल तामिळनाडूसारखे नाही. याचाचा अर्थ धोरण बदलणं गरजेच आहे. मात्र, 50 टक्क्यांच्यावर आरक्षण द्यायचं हा अधिकार केंद्राचा त्यामुळे आता ही समस्या सोडवण्यासाठी केंद्राने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.
मोठी बातमी : तत्काळ कोठडीची गरज नाही; पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा
जरांगेवर काय म्हणाले पवार?
जरांगेंच्या आगमी विधानसभा लढवण्याच्या भूमिकेबद्दल पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकसभेत प्रत्येकाचा आधिकार आहे. मत मागण्याचा. निवडणुक लढवण्याचा. त्यामुळे त्यांंनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असेल असे पवार म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका दुर्लक्ष करण्याजोगी नाही
यावेळी पवारांना विधानसभा निवडणुकांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबत विचारणा झाली. त्यावर त्यांनी याबाबत एकत्रित चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे उत्तर दिले. मात्र, नुकतीच पृथ्वीराज चव्हाण यांनी ज्याच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो. असा संकेत आहे अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली होती. त्यावर पवारांनी चव्हाण यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मांडलेली भुमिका दुर्लक्ष करण्याजोगी नसल्याचे म्हटले आहे.
बातमी अपडेट होत आहे…