Valmik Karad Supporters In Parali : परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर वाल्मिक कराडवर राजकीय दबावाखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून हे गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी वाल्मिक कराडच्या आईसह समर्थकांनी आंदोलन केले. रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आले असून आता आज समर्थकांची बैठक होणार आहे. (Valmik Karad) या बैठकीतून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असून वरिष्ठ अधिकारी येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
त्याचबरोबर दुसरीकडे आज वाल्मिक करायला पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार आहे. खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती तर दुसरीकडे मोका अंतर्गत कारवाईसाठी एसआयटी आज ताबा मागणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा न्यायालयासमोर युक्तिवाद होणार असून न्यायालय या प्रकरणावर काय निर्णय देते याकडं लक्ष लागलं आहे.
एकालाही सोडणार नाही.. वाल्मिक कराडावर मकोका दाखल होताच सुरेश धसांची प्रतिक्रिया
परळीमध्ये कराड समर्थक आक्रमक होताना दिसत आहेत. वाल्मिक कराडवर दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. आज दहा वाजता समर्थकांची बैठक आहे. त्यामध्ये पुढील भूमिका ही ठरवली जाणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येशी संबंधित खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडवर दाखल आहे. याबद्दलचा तपास सुरू असताना वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीये.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवस वाल्मिक कराड हा फरार होता. मात्र, त्यानंतर पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात दाखल होत कराडने आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला केजच्या न्यायालयात हजर केले असता सीआयडीकडे त्याची कोठडी होती. मात्र, खोटे आरोप करून वाल्मिक कराडला फसवले जात असल्याचा आरोप हा आता सातत्याने केला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी असूनही फरार आहे.