माझं लिंग हेच ‘शिवलिंग’ म्हणत महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा…इंद्रदेव महाराजांवर महिलेचे गंभीर आरोप!

वृंदावन आश्रमात इंद्रदेव महाराजांनी अनेक महिलांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत शोषण केले असल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.

Trupti Desai

Trupti Desai

Indradev Maharaj News : अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रात ताजं असतानाच आता पुण्यातून मोठी घटना समोर येत आहे. पुण्यातील वृंदावन येथील इंद्रदेव महाराज (Indradev Maharaj ) यांनी एका महिलेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत शोषण केले असल्याचं गंभीर आरोप पीडित महिला आणि भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून सांस्कृतिक असलेल्या पुणे शहरातून अशी घटना समोर आल्याने एकच चर्चा रंगलीयं. या घटनेप्रकरणी मीरा भाईंदरच्या काशीमिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींवर तत्काळ कारवाईची मागणी तृप्ती देसाईंनी केलीयं.

धार्मिक प्रवचन आणि सत्संगाच्या माध्यमातून महिलेचा विश्वास संपादन करून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा गंभीर आरोप वृंदावन येथील संत इंद्रदेव महाराज यांच्यावर करण्यात आला आहे. मिरारोड येथील ४२ वर्षीय महिलेने पत्रकार परिषद घेऊन आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार सांगितला. दीक्षा देण्यापासून ते आश्रमात बोलावून कथित अत्याचार करणे, व्हिडिओ कॉलद्वारे अश्लील कृत्ये करणे आणि नंतर बदनामीची भीती दाखवून धमकावणे, असा संपूर्ण घटनाक्रम महिलेने मांडला आहे.

महिलेच्या म्हणण्यानुसार, जानेवारी २०२३ मध्ये सोशल मीडियावर महाराजांचे प्रवचन पाहिल्यानंतर ती त्यांच्या संपर्कात आली. एप्रिल २०२३ मध्ये सांताक्रूझ येथील सत्संगात सहभागी झाल्यानंतर तिने महाराजांकडून दीक्षा घेतली. पुढे आपल्या वैयक्तिक अडचणी सांगितल्यानंतर त्या दूर करण्याचे आश्वासन मिळाल्याने तिचा महाराजांवरील विश्वास वाढला. आश्रमात बोलावून अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे.

मथुरेतील वृंदावन येथील सेवाधाम आश्रमात मुक्कामासाठी गेलेली असताना रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास महाराजांनी फोन करून आपल्या खोलीत बोलावल्याचा आरोप महिलेने केला आहे. कोणाला विचारल्यास औषध घेण्यासाठी जात असल्याचे सांग, असेही त्यावेळी सांगण्यात आले. खोलीत गेल्यानंतर दरवाजा बंद करून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे महिलेने आपल्या जबाबात म्हटले आहे. व्हिडिओ कॉलवर अश्लील कृत्ये रेकॉर्डिंगचा दावा इतकेच नव्हे तर २९ नोव्हेंबर २०२५ आणि २१ जानेवारी २०२६ रोजी व्हिडिओ कॉल करून अश्लील कृत्ये केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. समोरून स्वतःचे कपडे काढून महिलेलाही तसे करण्यास सांगितल्याचे तिने म्हटले आहे.

दरम्यान, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास सोशल मीडियावर बदनामी झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचे, तसेच १७ जून २०२६ रोजी ‘तुम्हे छोडूंगा नहीं’ असे म्हणत धमकावल्याचे महिलेने सांगितले. सुरुवातीला बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनाही काही सांगितले नाही. मात्र, अखेर धाडस करून महिलेने पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली असून काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.

माझे लिंगच शिवलिंग…
इंद्रदेव महाराजांनी महिलेच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला असून महिला, मुलींना आले लिंग दाखवून हे देवाचेच शिवलिंग असल्याचं सांगत शोषण केले असल्याचा दावा पीडित महिलेने केला आहे. माझ्यासह इतर अनेक महिला आणि मुलींच शोषण केले असल्याचाही दावा पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

Exit mobile version