वर्धा : 17 वे अखिल भारतीय विद्रोही मराठी साहित्य संमेलन ( Rebel Marathi Literary Conference) येत्या 4 व 5 फेब्रुवारीला वर्धा येथे होणार आहे. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन लेखिका अभिनेत्री रसिका अय्युब (Rasika Ayyub) यांच्या हस्ते तर समारोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील(B.G. Kolse Patil) यांच्या हस्ते होणार आहे. तर संमेलनाचे अध्यक्षपद जीवनवादी साहित्यिक चंद्रकांत वानखेडे भूषविणार आहेत.
विद्रोही मराठी साहित्य संमेलन चार व पाच फेब्रुवारीला वर्ध्यात घेण्याचा निर्णय साहित्यिक, अभ्यासक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या संमेलनाचे उद्घाटक लेखिका अभिनेत्री रसिका अय्युब यांच्या हस्ते होणार असून समारोप उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच संमेलनाचे अध्यक्षपद जीवनवादी साहित्यिक चंद्रकांत वानखेडे भूषविणार आहेत.
‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’ या बॉलीवूडपटातील ‘राबिया’च्या भूमिकेमुळे रसिका आगाशे अय्युब ओळखल्या जातात. ‘बीएचके भल्ला @ हल्ला डॉट कॉम’, ‘आजी’, ‘१ ते ४ बंद व अलीकडील विद्रोही कथाकार जयंत पवार लिखित व झी निर्मित ‘महाबळी’ या मराठी-हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष परिचित आहेत.
तसेच न्या. कोळसे पाटील मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत असताना त्यांनी शेतकरी आदिवासी कष्टकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिले आहेत. त्यांच्या कारकीर्दीतील जनहिताच्या अनेक निर्णयांचे शासनाला कायद्यात रूपांतर करावे लागले आहे. सेवानिवृत्तीनंतरही महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात ते हिरीरीने उतरले आहेत.
त्यांनी पुण्यातील लाल महालातील दादू कोंडदेवचा पुतळा हटवण्याच्या आंदोलनात पुढाकार घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. पी.बी. सावंत यांच्यासह न्या. कोळसे पाटील यांनी विषारी डाउकेमिकल कंपनी हटवण्यासाठी वारकऱ्यांना संघटित केले. त्याचप्रमाणे सामाजित क्षेत्रात त्यांचं नावलौकिक असून सामाजिक कार्यात दे अग्रेसर राहिले आहेत.
दरम्यान, संमेलनात विद्रोही संमेलनाचे पूर्वाध्यक्ष महाकवी-विचारवंत आदरणीय डॉ. यशवंत मनोहर यांचा अमृतमहोत्सवानिमित्त विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तर रविवारी दुपारी त्यांचे ‘एकमय राष्ट्रनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरप्रणीत संविधान संस्कृती’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.