Download App

Shegaon : संत गजानन महाराजांच्या भक्तांची उत्सुकता संपणार, ‘आनंद सागर’ उद्यान भाविकांसाठी खुलं होणार

Aanad sagar Garden In Shegaon : गेल्या अनेक दिवसांपासून विदर्भाची पंढरी अशी ओळख असणाऱ्या शेवगावला संत गजानन महाराजांचं मंदिर आहे. हे राज्यातील मोठ देवस्थान आहे. याच मंदिर परिसरात भक्त आणि पर्यटकांसाठी मोठ असं ‘आनंद सागर’ उद्यान आहे. मात्र गेल्या कीही दिवसांपासून हे उद्यान भक्तांसाठी बंद करण्यात आले होते.

मात्र आता ‘आनंद सागर’ उद्यानाला भेट देण्याची संत गजानन महाराजांच्या भक्तांची उत्सुकता संपणार आहे. कारण लवकरच ‘आनंद सागर’ उद्यान भाविकांसाठी खुलं होणार आहे. येत्या तीन ते चार महिन्यात हे उद्यान सुरू होणार असल्याचं सागण्याच येत आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मिडीयाद्वारे हे उद्यान खुले करावे अशी मागणी करण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियन विद्यापीठांत भारतीय विद्यार्थ्यांवर बंदी, काय आहे कारण?

2001 साली शेवगावच्या संत गजानन महाराज संस्थानने तब्बल 200 एकरमध्ये हे ‘आनंद सागर’ उद्यान उभारलेलं आहे. सरकारकडून जमीन घेऊन हे उद्यान उभारण्यात आलं आहे. यामागे शेगावला धार्मिक आध्यात्मिक पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळावी हा उद्देश होता. यामुळे शेगाव हे जगाच्या नकाशावर आले आहे. मात्र काही काळापूर्वी हे उद्यान बंद करण्यात आलं होत.

Tags

follow us