Aheri Assembly Election Result 2024: गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदरारसंघात महायुतीचे उमेदवार धर्मराबाबा आत्राम (Dharmarababa Atram) यांचा विजय झाला. त्यांना 53 हजार 978 इतकी मते मिळाली.
Dheeraj Deshmukh Defeat : काँग्रेसला लातुरमध्ये मोठा धक्का! अमित देशमुख यांचा पराभव
विधानसभेच्या तोंडावर भाग्यश्री आत्राम यांनी वडील धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरोधात बंड करून शरद पवार गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून अहेरी विधानसभेतील राजकारणाची राज्यपातळीवर चर्चा होती. अहेरी मतदारसंघात अजित पवार गटाकडून धर्मरावबाबा आत्राम तर शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम रिंगणात होत्या. त्यामुळे अहेरीत आता पिता विरुद्ध पुत्री, अशी लढत झाली. भाग्यश्री आत्राम विजयी होतील अशी चर्चा होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. भाग्यश्री यांचा 18409 मतांनी पराभव झाला.
Maharashtra Assembly Election : काँग्रेसला दिलासा, विश्वजीत कदम विजयी
22 व्या अंतिम फेरीत धर्मरावाबाबा आत्राम यांनी 53 हजार 978 मते मिळाली आहेत. तर अंबरीशरावा आत्राम यांना 37121 मते मिळाली असून त्यांचा 16 हजार 857 मतांनी पराभव झाला.
भाग्यश्री आत्राम तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवार ठरल्या. त्यांना 35 हजार 569 इतकी मते मिळाली.
दरम्यान, अहेरीत आजपर्यंत आत्राम काका पुतण्यात असलेल्या लढाईत मुलीने उडी घेतली होती. त्यामुळं आत्राम यांच्यासमोर दुहेरी आव्हान निर्माण झालं होतं. असं असतांनाही आत्राम यांनी आपला गड राखला.
2019 ला काय झालं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत अहेरीची राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा आत्राम यांनी जिंकली होती. 2019 मध्ये अहेरी विधानसभा मतदारसंघातील जय-पराजयाचा फरक 15458 इतका होता. धर्मरावबाब आत्राम यांनी 2019 ला भाजपचे उमेदवार अंबरीशराव आत्राम यांचा पराभव केला. केला होता.