Maharashtra Assembly Election : काँग्रेसला दिलासा, विश्वजीत कदम विजयी
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठे धक्के बसत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पलूस कडेगावमधून विश्वजीत कदम यांचा विजय झाला आहे. त्यांनी महायुतीचे संग्राम देशमुख यांच्या पराभव केला आहे.
महाविकास आघाडीला या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठे धक्का बसले आहे. नगर जिल्ह्यात तिन्ही माजी मंत्र्यांचा पराभव झाला आहे. नेवासा मतदारसंघातून गडाख, राहुरी विधानसभा मतदारसंघातून तनपुरे आणि संगमेनर विधानसभा मतदारसंघातून थोरात यांचा पराभव झाला आहे. तर कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आहे. याचबरोबर काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा देखील पराभव झाला आहे. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभव केला आहे.
तर दुसरीकडे अजित पवार यांनी देखील बारामती विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा पराभव केला आहे. याच बरोबर कसाब विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने 19,320 मतांनी विजयी झाले आहेत.