Download App

Akola riots : अकोला दंगलीचा मास्टमाईंड कोण? त्याचा तातडीने तपास करा…

Akola riots : अकोला शहरातील हरिहरपेठमध्ये घडलेल्या दंगलप्रकरणावर अजित पवारांनी भाष्य केलं आहे. अकोला दंगलीमागचा मास्टरमाईंड कोण आहे, याबाबतची चौकशी तातडीने करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी हरिहरपेठमध्ये दोन गटांत तुफान राडा झाला. या राड्यादरम्यान, 10 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाला.

लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी, अजित पवारांनी सांगितलं सरकारच्या मनातलं

अजित पवार म्हणाले, सोशल मीडियामध्ये क्लिप व्हायरल झाल्यानंतर एका गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने दंगल घडली. अशा घटनांवर राज्य सरकारने आवर घातला पाहिजे. याबाबत ज्याने कोणी ही क्लिप व्हायरल केली आहे त्याचा तपास तातडीने केला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत.

Kalicharan Maharaj : आमदार-खासदारांनी पिन मारली म्हणून… ‘त्या’ गुन्ह्यावर कालीचरण महाराजांची प्रतिक्रिया…

तसेच राज्याच्या तपास यंत्रणेच्या हाती खूप बाबी आहेत. त्यांनी यामागचा मास्टरमाईंड कोण? त्याचा खोलात जाऊन तपास केला पाहिजे. असा व्हायरल व्हिडिओ दुसरकडे पसरायला अधिक वेळ लागणार नाही. त्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण खराब होईल, त्यामुळे तपास यंत्रणेने याचा तपास करावा.

भाजपची मोठी खेळी; डी. के. शिवकुमार यांच्या नाड्या आवळण्यासाठी प्रवीण सूद यांची CBI संचालकपदी नियुक्ती

अशा घटनामध्ये पोलिस यंत्रणेत कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे, पोलिसांना या प्रकरणी मोकळा हात दिला पाहिजे, जेणेकरुन ते व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यावर कारवाई करता येऊ शकते, असं अजित पवार म्हणालेत.

दरम्यान, दंगलीच्या घटनेनंतर अकोला शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तत्काळ कलम 144 लागू करण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून कोंबिग ऑपरेशन राबवण्यात आलं असून आत्तापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे. घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या सहा तुकड्या नेमण्यात आल्या असून शहरात सध्या तणापूर्ण शांतता आहे.

Tags

follow us