Download App

अकोल्यात राडा! सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, दगडफेकीत एका जणाचा मृत्यू

अकोला शहरातील जुने शहर भागात हरिहरपेठमध्ये दोन गटांत राडा झाल्याची घटना घडलीय. दोन गटांत राडा झाल्यानंतर मोठी दंगल उसळ्याचं समोर आलं आहे. या घटनेत 10 जण जखमी तर 1 जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हरिहरपेठ भागातील राजराजेश्वर भागांत एका गटाने दुसऱ्या गटावर दगडफेक करीत जाळपोळ केली आहे. तसेच राड्यामध्ये वाहनांची तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनूसार दोन्ही गटातील एकूण 10 जण गंभीर जखमी आले आहेत.

कानडी राजकारणातले हुकमी एक्के जारकीहोळी बंधू! सत्ता कोणाचीही असो लाल दिवा फिक्स…

या घटनेनंतर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शहरात कलम 144 लागू करण्याचे आदेश दिले असून एका व्यक्तीने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याने ही दंगल भडकल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी रामदास पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या अकोला शहरात तणापूर्ण शांतता आहे.

Jayant Patil : बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली

एका फेसबुक पोस्टवरुन या राड्याला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. एका तरुणानं ही फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमुळे वातावरण चिघळलं आणि त्यानंतर दोन समुदायांमध्ये तुफान राडा झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, अकोला शहरातील दोन गटांत तणाव निर्माण झाला. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच शहराच्या काही भागांत अचानक दगडफेक सुरू करण्यात आली. वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली.

SRH vs LSG : हैदराबादने लखनौविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून अकोल्यात कायदा सुव्यवस्थेची बिघडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. अकोल्यात सध्या हरिहरपेठ आणि इतर संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांकडून शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसेच या प्रकरणी आतापर्यंत 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Tags

follow us