Download App

Amol Mitkari : पक्षाने संधी दिली तर लोकसभा लढवणार

अकोला : पक्षाने संधी दिल्यास भाजपाविरोधात अकोला (akola) मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार अमोल मिटकरी यांनी जाहीर केले आहे. भाजपचा भ्रष्ट कारभार असून त्याविरोधात लढणार असल्याचे आ. मिटकरी यांनी सांगितले. होळीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ट्विट करून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड वर्षापासून सक्रीय राजकारणापासून दूर आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता आ. मिटकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

आ. अमोल मिटकरी यांनी ट्विट म्हटले की, माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरूद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार. जिल्ह्याला भाजपने वाऱ्यावर सोडलेला आहे. गेल्या अनेक वर्षात जिल्ह्यामध्ये एकही प्रकल्प नाही. विकास कामे नाहीत. तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात चालायला रस्ता नाही आणि गेल्या दोन वर्षापासून अकोलेकरांना खासदार दिसलेच नाही.

त्यामुळे मी माझ्या पक्षात मागणी करणार आहे की मला लोकसभेची उमेदवारी द्यावी. जर पक्षाने उमेदवारी दिली तर येणाऱ्या 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकी जिंकून येण्याचा ध्यास राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवल आहे.

Nashik : 65 हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान

सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचाराने ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरूद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची ही संधी सोडायची नाही, असे देखील त्यांनी नमूद केले. आ. मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेवर नियुक्त आमदार आहेत.

Tags

follow us