Nashik : 65 हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान

Nashik : 65 हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान

नाशिक : राज्यात धुलिवंदनाचा (Dhulivandan) सण साजरा केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील जवळपास 65 हजार हेक्टरवरील कांदा (Onion) पिकांचे नुकसान झाले आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) फटका बसलाय. जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे तर धुळ्यात गारपीटीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळी, गहू, हरभरा, मका या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा आंबा, काजू या पिकांना देखील फटका बसतोय. झाडांना आलेला मोहर गळू लागलाय. झाडांवर तयार झालेली फळं देखील गळायला सुरुवात झालीय.

नाशिक जिल्ह्यात 1800 हेक्टरवरील गव्हाचं पीक भुईसपाट झालं आहे. गव्हाच्या पिकांसोबत द्राक्ष बागांचे देखील मोठं नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाच्या अगमनामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सावधान! H3N2 इन्फ्लूएंझा कोरोनासारखाच…, डॉ. गुलेरियांकडून भीती व्यक्त

रब्बी पिकांमध्ये गव्हाचं महत्वाचे पीक असतं. प्राथमिक अंदाजानुसार गव्हाच्या पिकांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 1800 हेक्टरवरील गव्हाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांचे 750 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

तर जवळपास 65 हजार हेक्टरवरील कांदा पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसाने झालेल्या भागातील पिकांचे लवकरच पंचनाम्याला सुरुवात केली जाणार आहे. येत्या आठवड्यात पंचनामे पुर्ण करून शासनाला सादर केले जाणार आहेत, अशी माहिती नाशिकच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube