Download App

Amravati : राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडांना अटक; एटीएसच्या कारवाईने एकच खळबळ…

अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं.

Amravati ATS Action : अमरावतीच्या परतवाडा भागात एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून 11 सशस्त्र गुंडाना अटक केल्याची माहिती समोर आलीयं. या घटनेमुळे अमरावती शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून एटीएस (Amravati ATS Action) आणि ग्रामीण पोलिसांनी काल रात्री ही कारवाई केलीयं. यासंदर्भात अद्याप पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसून एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरातून एकूण 11 जणांना शस्त्रासह अटक करण्यात आल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

राज ठाकरे, अंबानी, शाहरुख खानकडून पैसे घ्या! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मनोज जरागेंनी दिली थेट लिस्टच…

एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी दोन ठिकाणांहून या सशस्त्र गुंडांना अटक केली असून अमरावती जिल्ह्यातील परतवाड्यातील ब्राम्हण सभा कॉलनीतून 5 जणांना अटक केलीयं तर कश्यप पेट्रोल पंपाजवळ 6 जणांना शस्त्रासह पकडण्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांना यश आलंय. या घटनेमुळे सध्या एकच खळबळ उडालीयं.

विजयादशमीच्या शुभमुहुर्तावर दसरा मेळावा अन् संघाची शताब्दी, मोहन भागवतांनी केलं गांधींचं स्मरण

अमरावतीमधील एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरात मागील अनेक दिवसांपासून हे गुंड राहत होते. या गुंडांबाबत अद्याप पोलिसांनी माहिती दिली नाही, मात्र, हे गुंड आंतरराज्यीय टोळी असल्याचं सांगितलं जात आहे. या टोळीचा संबंध हरियाणा राज्यात असल्याचीही चर्चा आहे. एका राजकीय कार्यकर्त्याच्या घरात शस्त्रासह गुंड मिळून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मराठवाड्यातील अस्मानी संकटाच्या भेगा ताज्या असतानाच आलं नवं संकट, जमिनीला भेगा, भिंतींना तडे

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या गुंडांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. हे गुंड राजकीय कार्यकर्त्याच्या घरात भाड्याने राहत असल्याचंही बोललं जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील ब्राम्हण सभा कॉलनीतून पाच जणांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडालीयं.

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येच भळभळत वास्तव; वाचा, ‘नॅशनल गुन्हे नोंद ब्युरोचा धक्कादायक अहवाल

follow us