Download App

Anil Deshmukh यांचं मोठं विधान; सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार

Anil Deshmukh : राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एक मोठं विधान केलं आहे त्याच्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर बोलत होते. ते म्हणाले की, सोडून गेलेले आमदार शरद पवारांकडे परतणार आहेत. त्यांच्या या विधानाने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.

काय म्हणाले अनिल देशमुख?

आज राज्यातील अनेक ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यावेळी नागपूरमधील काटोल मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा एकतर्फी विजय झाल्याचा दावा माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी एक मोठा विधान देखील केलं.

World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच बांग्लादेशकडून लंकेची शिकार ! तीन विकेट्सने केला पराभव

ते म्हणाले, ‘खुशाल बोपचे हे ज्याप्रमाणे शरद पवार गटात परत आले आहेत त्यामुळे आता अजित पवार गटातील आमदारांची शरद पवार गटामध्ये इन्कमिंग सुरू झाले आहे. इतर आमदार देखील लवकरच परत येतील. त्याचबरोबर काही आमदार खाजगीत बोलताना सांगतात की, सत्तेचा फायदा घेण्यासाठी आम्ही अजित पवार यांच्यासोबत आलो आहोत. मात्र निवडणुका जवळ आल्यावर आम्ही पक्ष बदलून परत येऊ.’ असं देशमुख म्हणाले.

Rajasthan Election 2023 : नागपूरमध्ये प्लॉट, दिल्लीत घर; मुख्यमंत्री गहलोतांची संपत्ती किती वाढली?

दरम्यान अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात एकूण 83 ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यापैकी 38 जागांवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने विजय संपादन केल्याचा दावा देशमुख यांनी केला. तर जवळपास 80 टक्के जागा आम्ही जिंकत असल्याचेही ते दुपारी म्हटले होते. दरम्यान या विजयानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजयाचा आनंद साजरा केल्याचं पाहायला मिळालं.

Tags

follow us