Apmc Election Digras: यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अन्न व औषध प्रशासन मंत्री, पालकमंत्री संजय राठोड यांना जोरदार धक्का बसलाय. राठोड यांच्या गटाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. माजी मंत्री संजय देशमुख यांच्या गटाने राठोड यांना हा धक्का दिला आहे.
शिंदे पायउतार झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ नावाला सर्वाधिक पसंती
दिग्रस बाजार समितीची माजी मंत्री संजय देशमुख आणि विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली होती. या बाजार समितीसाठी आज मतदान झाले. त्यानंतर लगेच मतमोजणी झाली. १८ पैकी १४ जागा मंत्री संजय देशमुख समर्थक गटाला मिळाल्या आहे. राठोड गटाला केवळ चार जागा मिळाल्या आहेत.
विखे-कर्डिलेंना धक्का, तनपुरेंचे उमेदवार आघाडीवर
सत्ताबदलानंतर राठोड हे शिंदे गटात गेले. त्यानंतर झालेल्या दिग्रस बाजार समिती निवडणुकीत राठोड यांना देशमुखांनी धूळ चारली आहे. मूळ शिवसेनेशी फारकत घेऊन शिंदे गटात गेल्यामुळे त्यांना हा धक्का असल्याचे बोलले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसून आले आहे.