शिंदे पायउतार झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ नावाला सर्वाधिक पसंती

  • Written By: Published:
शिंदे पायउतार झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ नावाला सर्वाधिक पसंती

C Voter Survey : राज्याच्या राजकारणात सध्या सट्टेबाजार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) हे पदावरून पायउतार होण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री कोण होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दावेदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव पुढे आले आहे. तसेच काही लोक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये क्रमांक दोनचे स्थान असलेले अजित पवार(Ajit Pawar) यांचेही नाव घेत आहेत.

शिवसेनेतून बंडखोरी करून भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे (Eknatha Shinde)  राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गमवावी लागू शकते, अशी राजकीय शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांची लवकरच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होऊ शकतात, असा दावा अनेक नेते करत आहेत. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणात नव्या मुख्यमंत्र्यांच्या संभाव्य नावांची माहिती समोर आली आहे. यावेळी लोकांकडून त्यांचे मत विचारण्यात आले.

Vikhe-Kardile यांना मोठा धक्का, Prajakt Tanpure यांनी बाजार समिती ठासून आणली !

एकनाथ शिंदे यांच्यानंतर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना या सर्वे मध्ये सर्वाधिक पसंती मिळाली आहे. 28 टक्के लोकांना वाटते उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावे, अशी २६ टक्के लोकांची इच्छा आहे. तर अजित पवार यांच्याकडे राज्याची गादी सोपवावी, असे ११ टक्के लोकांचे मत आहे. तर 35% लोक म्हणतात माहित नाही.

उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यानंतर अनेकदा जनतेला उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती असल्याचे दिसून आले आहे. सी-व्होटरच्या सर्वेक्षणातही हीच बाब समोर आली आहे. सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार लोकांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती आहे.

सी-व्होटरने 24 एप्रिल ते 26 एप्रिल या कालावधीत हे सर्वेक्षण केले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube