Savner Assembly Election Result 2024 : सावनेर विधानसभा मतदारसंघात सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार (Anuja Kedar) यांचा 25 हजारांहून अधिक मतांनी पराभव करून आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी इतिहास रचला.
साकोलीत नाना पटोले विजयी, भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा अवघ्या 529 मतांनी पराभव…
24 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र विधानसभेतून काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना अपात्र ठरवण्यात आल्याने सावनेर विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला होता. यानंतर केदार यांच्या पत्नी अनुजा यांनी सावनेर मतदारसंघातून कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली, तर त्यांच्या विरोधात भाजपकडून आशिष देशमुख रिंगणात होते. इथेही फारसे मत विभाजन होण्याची शक्यता नव्हती. मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय यांना भाजपने जिल्ह्याचे पालकत्व दिले होते. ते आणि त्यांची खास माणसे सावनरे मतदारसंघात ठाण मांडून होते. पहिल्या फेरीपासून सुरू झालेले आशिष देशमुखांचे मताधिक्या अखेरपर्यंत कायम राहिले. अखेर त्यांनी 26 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला.
महाविकास आघाडीच्या पराभवाचं प्रमुख कारण काय? वाचा एका क्लिकवर…
अंतिम फेरी
आशिष देशमुख – 1 लाख 18 हजार 906 मते मिळाली आहेत. त्यांनी + 26522 मतांची आघाडी घेतली. अनुजा देशमुख या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या असून त्यांना
92 हजार 384 मते मिळाली असून त्यांचा 26 हजार 522 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.
बहुजन समाज पार्टीच्या तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या ताराबाई गौरकर यांना 2 हजार 239 मते मिळाली. तर वंचितचे अजय सहारे यांना अवघी 2 हजार 126 मते मिळाली.
देशमुख हे 26 हजार मतांनी विजय झाले असून हा सुनील केदार यांना फार मोठा धक्का मानला जातो आहे. यामुळे केदार यांचा अनेक वर्षांचे प्रस्त धोक्यात आले आहे.
महायुती तब्बल 232 जागांवर आघाडीवर
आतापर्यंत महायुती तब्बल 232 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 135 जागांवर आघाडीवर आहे. तर शिंदे गट 56 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवार यांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं फडणवीस मुख्यमंत्रिपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला.