छगन भुजबळांना लवकरच मिळणार मोठं पद; भाजप नेत्याचा मोठा दावा
Ashish Deshmukh on Chhagan Bhujbal : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक माजी मंत्र्यांचा पत्ता कट करण्यात आला. शिंदे गटातील तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं नाही. तर अजित पवार गटानेही माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिपद नाकारलं. यानंतर छगन भुजबळ यांनी आपली नाराजी स्पष्ट शब्दांत बोलून दाखवली. यानंतर त्यांचे समर्थक कार्यकर्ते देखील कमालीचे आक्रमक झाले. यातच भुजबळ काही वेगळा निर्णय घेतात का अशीही चर्चा सुरू झालेली असताना भाजप नेत्याने त्यांच्याबाबतीत मोठा दावा केला. छगन भुजबळ यांना राज्यपाल बनवले जाऊ शकते असा मोठा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे.
“तेरे बिना दिल नही लगता” भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा गटाचं सूचक वक्तव्य
देशमुख पुढे म्हणाले, मंत्र्यांना डच्चू देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक पक्षाला ठरलेल्या मंत्रिमंडळाच्या संख्येपैकी काही लोकांना संधी देणे गरजेचे होते. जुने अनुभवी लोकही त्यात आहेत. नव्या लोकांना अनुभव देण्याचं काम सरकारने केलं आहे.
आज जर अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर नक्कीच आगामी काळात भुजबळ यांच्या बाबतीत काही मोठा निर्णय होणार असेल. मोठा निर्णय म्हणजे भुजबळ देशातील एखाद्या राज्याचे राज्यपालही होऊ शकतात. त्यांच्या पक्षाने तशी एखादी योजना बनवली असेल असा दावा भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला.
भुजबळ काय म्हणाले होते?
याआधी सोमवारी छगन भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. ते म्हणाले होते की, मला मंत्रिमंडळातून का काढून टाकण्यात आले हे मला माहीत नाही. पण, सात-आठ दिवसांपूर्वी माझं माझ्या वरिष्ठांशी बोलणं झालं होतं. त्यावेळी तुम्हाला राज्यसभेवर जायचे असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू, असे ते म्हणाले. मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचे होतं तेव्हा तुम्ही मला संधी दिली नाही. तुम्ही लढाईत असाल तर पक्ष ताकदीने पुढे जाईल, असे सांगितलं गेलं.
माझ्या येवला-लासलगाव मतदारसंघातील मतदारांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आहे. लगेच राज्यसभेवर जाऊ शकत नाही. हा माझ्या मतदारांचा विश्वासघात ठरेल. ज्यांनी माझ्यावर प्रेम केले त्यांचा विश्वासघात मी करणार नाही, असे ते म्हणाले. तर पक्षाने डावलल्यानंतर तुमची पुढील भूमिका काय असेल? असे विचारले असता भुजबळ यांनी आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना, असं सूचक वक्तव्य केलं होतं.
भुजबळ अन् मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपची प्रतिक्रिया; काय म्हणाले बावनकुळे?