सावनेरमध्ये केदारच लढणार, यादी जाहीर होण्याआधीच अनुजा केदारांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज…

  • Written By: Published:
सावनेरमध्ये केदारच लढणार, यादी जाहीर होण्याआधीच अनुजा केदारांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज…

Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. आज मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या पत्नी अनुजा केदार (Anuja Kedar) यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. खरंतर अनुजा केदार काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

खेड बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीचा वाद संपेना; आता तर सभापतींचा आमदार मोहितेंना कारवाईचा थेट इशारा 

नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्यात सुनील केदार दोषी आढळल्यानंतचर न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच त्यांचे विधानसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आले. त्यामुळं केदार यांच्या सावनेर मतदारसंघातून कोण लढणार, त्यांचे वारसदार कोण असणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. कधी सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांचे नाव पुढे केले जायचे तर कधी त्यांच्या दोन मुली पूर्णिमा आणि पल्लवी विधानसभा निवडणूक लढवणार अशा बातम्या यायच्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

नवाब मलिक यांची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय; दिल्लीतील बैठकीत ठरलं सूत्रांची माहिती 

आता सावनेरमधून कोण निवडणूक लढवणार हे समोर आले आहे. विधानसभा निवडणुकीत सुनील केदार यांच्या जागी पत्नी अनुजा केदार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसची यादी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. इतकचं नाही तर केदार आणि त्यांच्या समर्थकांनीही अनुजा केदार यांच्या प्रचारालाही सुरूवात केली.

सावनेर विधानसभा मतदारसंघ हा केदार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. सुनील केदार 1995 पासून सातत्याने या जागेवरून आमदार म्हणून निवडून आलेत. 2014 मध्ये भाजपने नागपूर जिल्ह्यातील 12 पैकी 11 जागा जिंकल्या होत्या. मात्र तरीही केदार यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले होते.

सुनील केदार यांना पराभूत करण्याचे अनेकदा प्रयत्न भाजपने केले. मात्र, अमित शाह यांच्यासारख्या नेत्याला प्रचारात उतरवूनही भाजपला केदार पराभूत झाले नाहीत. दरम्यान, सुनील केदार यांनी आपल्या पत्नी अनुजा यांना निवडणुकीत उतरवण्याच निर्णय घेतल्यानं आता त्यांच्या विरोधात भाजप कोणाला रिंगणात उतरवणार हेच पाहणं महत्वाचं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube