Bacchu Kadu : अनोख्या शैलीतील आंदोलने करणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांग कल्याण निधीच्या मुद्द्यावरून थेट यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मुख्याधिकाऱ्यांनाच तंबी दिली. निधी वाटपात जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेन. यानंतर जर कमी निधी दिला तर तिथे येऊन वांदा करेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्वनिधीतील तीन टक्के राखीव असलेला निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी खर्च केलेला नाही. हा निधी मागील तीन वर्षांपासून अखर्चित असल्याची तक्रार बच्चू कडू यांना मिळाली होती. या तक्रारीची दखल घेत कडू यांनी अधिकाऱ्याला चांगलेच खडसावले. अनुशेषासह निधी वाटप करा. यानंतर जर निधी कमी दिला तर तिथं येऊन वांदा करेल. एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी खर्च करा. दिव्यांगांच्या निधीचे वाटप चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. आस्थापनांचा खर्च काढून तुमचाही खर्च काढा. डिझेल, मटण, चिकन या सगळ्यांचा खर्च काढा. एक लाख पगार घेता पण डोकं लावत नाही. थोडं मन लावा, अशा शब्दांत आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.
Bacchu Kadu : आता सरकारने शब्द पाळला नाही तर.. बच्चू कडूंचा सरकारला रोखठोक इशारा