Bachchu Kadu On Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation ) देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. तर ओबीसी समाजही मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, या मताचा आहे. त्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे असलेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एक मोठे विधान केले आहे. मराठा आरक्षणाला विरोध करून उलट्या बोंबा मारत बसू नका, मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आम्ही मैदानात उतरू असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.
National Herald Case : गांधी कुटुंबाला अडचणीत आणणारं नॅशनल हेराल्ड प्रकरण काय?
बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थानला नाही गेले तर मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. राज्यातील सर्व मराठा नावानेच ओळखले जायचे. महाराष्ट्रात राहणारे मराठी म्हणजेच मराठा असे म्हटले जायचे आहे. मराठ्यांना आरक्षण ही सर्व मंत्रिमंडळ आणि शासनाची जबाबदारी नाही. मुदतीत शासनाने प्रगती अहवाल द्यावा नाहीतर आम्ही देखील आंदोलनात सहभागी होणार आहे. 24 डिसेंबरला मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास किंवा प्रगती अहवाल न दिल्यास मी स्वतः मैदानात उतरणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
Dhangar Reservation : ‘निवदेन घ्यायला कोणी आलंच नाही म्हणूनच..,; दगडफेक प्रकरणावर पडळकर बोलले
75 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण भेटलेले नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे काही जण बोंबलत आहेत. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारवर चांगले परिणाम होणार नाहीत, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. मराठा समाज कुणबी नाही का ? तो राजपूत गुजराती आहे का ? मराठा समाज अमेरिकन, जपानीज आहे का ? हेच तुम्हाला सांगता येत नाही तर उलट्या बोंबा का मारत आहे, असा सवालही बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.